Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

बोरिवलीत दोन गटांच्या हाणामारीत ४ जण जखमी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 7, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
बोरिवलीत दोन गटांच्या हाणामारीत ४ जण जखमी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : बोरिवलीत दोन गटांत झालेल्या हाणामारीत ४ जण जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी ही घटना घडली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून दोन्ही गटातील लोकांवर एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बोरीवली पश्चिमेकडे एमएचबी पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्याला लागून शिववडा नावाची वडापाव विक्रीची गाडी आहे. यादव नावाचे कुटुंबिय ही वडापाव विक्रीची गाडी चालवतात. त्यांच्याकडे पवन दुबे नावाचा एक कर्मचारी काम करत होता. काही दिवसांपूर्वी या दुबेच्या परिचयातील महिलेचे छायाचित्र फेसबुकवर टाकण्यात आले होते. त्याबद्दल मागील आठवड्यात दुबे याने येऊन जाब विचारला होता. त्यानंतर फेसबुकवरून ते छायाचित्र हटविण्यात आले होते. सोमवारी या मुद्द्यावरून पुन्हा यादव आणि दुबे यांच्यात वाद झाला होता.

बुधवारी सकाळी दुबे आपल्या तीन साथीदारांसह शिववडापावच्या गाडीवर आला. त्याने चाकूने यादव कुटुंबियांमधील तिघांवर हल्ला केला. यावेळी दोन्ही गटात हाणामारी झाली. यादव कुटुंबातील लोकांनीही त्याच चाकूने दुबेवर हल्ला चढवला. या हाणामारीत पवन दुबे तसेच यादव कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. जखमींना कांदिवलीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Previous Post

उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर कुरेशी समाज संघटनांचा संप मागे

Next Post

मुंबईत आज स्थानिक सुट्टी जाहीर, शासकीय कार्यालये तीन दिवस बंद

Next Post
मुंबईत आज स्थानिक सुट्टी जाहीर, शासकीय कार्यालये तीन दिवस बंद

मुंबईत आज स्थानिक सुट्टी जाहीर, शासकीय कार्यालये तीन दिवस बंद

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.