Lokrakshanay
Sunday, April 26, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

नेपाळमध्ये अडकले १५० महाराष्ट्रीय पर्यटक, सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 11, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
नेपाळमध्ये अडकले १५० महाराष्ट्रीय पर्यटक, सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : भारताच्या शेजारी नेपाळमध्ये ‘जेन झी’ तरुण वर्ग रस्त्यावर उतरल्याने सरकारविरोधात दोन दिवस जी हिंसक आंदोलने सुरु आहेत, त्यामध्ये राज्यातील १५० पर्यटक अडकले आहेत. यामध्ये सर्वाधिक ६५ पर्यटक ठाणे जिल्ह्यातील असून सर्व पर्यटक सुखरुप आहेत, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील १५० पर्यटकांमध्ये ठाणे जिल्ह्यातील ६५, पुणे ५, मुंबई ६, अकोला १०, यवतमाळ १, लातूर २, कोल्हापूर जिल्ह्यातील एका पर्यटकाचा समावेश आहे. उर्वरित पर्यटकांच्या जिल्ह्यांची माहिती मिळालेली नाही. राज्यातील पर्यटक ६ टूर ऑपेटरच्या माध्यमातून नेपाळमध्ये पर्यटनाला गेले होते. नेपाळमधील विमान व रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने सर्व पर्यटकांचा हॉटेलात मुक्काम आहे. बीड जिल्ह्यातील ११ पर्यटक बसव्दारे उत्तर प्रदेशात सुखरुप पोचले आहेत.

१२ पर्यटक कैलास मानसरोवर यात्रेकरु असून सध्या ते चीन सीमेशेजारील कुरांग प्रांतात अडकले आहेत. ‘तुम्ही जिथे आहात तिथे राहा. हॉटेलबाहेर पडू नका. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा’, असे आवाहन भारतीय दूतावासाने भारतीय पर्यटकांना केले आहे. शुक्रवार पर्यंत नेपाळमधील विमान सेवा पुर्ववत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पर्यटकांना सुखरुप आणणे शक्य होणार आहे. ‘राज्यातील पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे’, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी दिली.

Previous Post

एटीएममध्ये ९० टक्के १००-२०० च्या नोटा लोडिंग करण्याची रिझर्व्ह बँकेच्या सूचना, ५०० रुपयांची नोट बंद होणार का ?

Next Post

जिल्हा परिषदेच्या ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद, साडेतीन हजाराहून अधिक नागरिकांना घरपोच दाखले

Next Post
जिल्हा परिषदेच्या ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद, साडेतीन हजाराहून अधिक नागरिकांना घरपोच दाखले

जिल्हा परिषदेच्या ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद, साडेतीन हजाराहून अधिक नागरिकांना घरपोच दाखले

BreakingNews

भक्तीसोबतच आता जनसेवा! दगडूशेठ ट्रस्टकडून गरजूंसाठी आता मोफत आरोग्य सेवा केंद्र सुरू

वसई-विरारमध्ये भटक्या श्वानांसाठी उभारणार ४४ ‘डॉग फीडिंग स्पॉट’!

आता रेशनवर धान्यच नाही, साडीही मिळणार! – राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ची धडाक्यात तयारी; डिजिटल प्रक्रियेसाठी प्रगणक-पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

ई-केवायसीअभावी शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन थांबणार?

PF Withdrawal Update: आता ATM मशीनमध्ये कार्ड टाका आणि PF चे पैसे मिळवा!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.