Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेची विशेष त्रैमासिक मोहीम सुरू

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 13, 2026
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेची विशेष त्रैमासिक मोहीम सुरू
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : शहरातील वाढत्या मालमत्ता कर थकबाकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने पुढील तीन महिन्यांत व्यापक वसुली मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीदारांकडून मालमत्ता कराची वसुली करण्यावर विशेष भर दिला जाईल, अशी ग्वाही आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मंगळवारी झालेल्या अर्थसंकल्पीय महासभेत दिली. कर वसुलीशिवाय विकासकामे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. २०२५-२६ या आर्थिक वर्षात ८७६ कोटींची विक्रमी करूनही महापालिकेच्या आकडेवारीनुसार शहरातील १ लाख ५८ हजार २५१ मालमत्ताधारकांकडे तब्बल २,९१५ कोटी ८६ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये मूळ कराची रक्कम १,१२७ कोटी ७३ लाख रुपये असून दंड व व्याजाचा आकडा १,७१८ कोटी १२ लाख रुपयांवर गेला आहे. म्हणजेच थकीत करापेक्षा दंड व व्याजाचा बोजा अधिक झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर महसूल वसुली यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महासभेत सदस्यांनी या विषयावर प्रशासनाला जाब विचारत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. कर भरणाऱ्यांपेक्षा कर टाळणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असून, विकासकामांच्या निधीवरही त्याचा परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. त्यावर उत्तर देताना आयुक्तांनी, विशेष पथके तयार करून थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येईल तसेच मोठ्या थकबाकीदारांकडून वसुलीला प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. थकबाकीदारांच्या यादीत शासकीय संस्थांचाही समावेश असल्याची बाबही सभागृहात पुढे आली. सिडकोकडे सुमारे २४७ कोटी, रेल्वेकडे ३७ कोटी आणि वीज विभागाकडे १५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. याशिवाय शहरातील सुमारे १,२०० मोबाइल टॉवरकडून ३८७ कोटी रुपये थकीत असून, अनधिकृत बांधकामांमधील ३८ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांकडे सुमारे २५२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या घटकांकडून वसुली करताना प्रशासनास अडचणी येत असल्याचेही नमूद करण्यात आले.

Previous Post

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

Next Post

नाशिक गृहनिर्माण घोटाळा; बिल्डरांनी हडपलेली २० टक्के जागा ‘म्हाडा’ परत घेणार

Next Post
नाशिक गृहनिर्माण घोटाळा; बिल्डरांनी हडपलेली २० टक्के जागा ‘म्हाडा’ परत घेणार

नाशिक गृहनिर्माण घोटाळा; बिल्डरांनी हडपलेली २० टक्के जागा 'म्हाडा' परत घेणार

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.