Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

कुर्ल्यातील धक्कादायक बस अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर

व्हिडीओमध्ये बसचा चालक संजय मोरे आणि कंडक्टर बसमधून सर्वात शेवटी खाली उतरताना दिसत आहेत

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 12, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
कुर्ल्यातील धक्कादायक बस अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबईतील कुर्ला पश्चिम भागात सोमवारी सायंकाळी भरधाव वेगाने येणाऱ्या बेस्ट बसने पादचाऱ्यांना धडक दिली, तसेच अनेक वाहनांना धडक देऊन सात जणांना मृत्यूमुखी नेले आणि अनेक जण जखमी झाले. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासानुसार, बसचा चालक योग्य प्रशिक्षण घेतलेला नव्हता आणि ब्रेक लावताना त्याने एक्सेलेटर दाबल्याचे समोर आले आहे. भरधाव वेगाने बस वर्दीच्या ठिकाणी घुसताच, ती वाहनांना आणि पादचाऱ्यांना चिरडत गेली. आता बसमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून, अपघाताच्या वेळी बसमध्ये काय घडलं हे स्पष्ट झाले आहे.

कुर्ला परिसरात ९ डिसेंबर रोजी घडलेल्या बेस्ट बस अपघाताचे घाव अद्याप ताजे आहेत. कुर्ल्यातील या धक्कादायक बस अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. व्हिडिओमध्ये कंडक्टर बसमध्ये तिकीट देत आहे, आणि बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी आहे. काही प्रवासी सीटवर बसले आहेत, तर काही उभे आहेत. त्यानंतर अचानक बसचा वेग वाढला आणि बसमधील सर्व प्रवासी घाबरले. इमारतीच्या भिंतीला धडक देऊन काही वेळाने बस रिकामी झाली, असे व्हिडीओमध्ये दिसते.

बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये अपघाताच्या क्षणाचा थरार टिपला गेला आहे. बस नियंत्रणाच्या बाहेर जाण्यापूर्वी गाडीमध्ये बसलेले आणि उभे असलेले प्रवासी आपल्या सोबत काय होईल याबद्दल अनभिज्ञ होते. बस सुरू होताच ती वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक देत भिंतीला आदळली. घाबरलेले प्रवासी हँडलबार पकडून बसले होते, त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत टळली. बस थांबल्यानंतर, प्रवाशांनी फुटलेल्या खिडकीतून उडी मारून आपला जीव वाचवला.

व्हिडीओमध्ये बसचा चालक संजय मोरे आणि कंडक्टर बसमधून सर्वात शेवटी खाली उतरताना दिसत आहेत. अपघातानंतर, संजय मोरे आपली बॅग घेऊन बसमधून खाली उतरला.

दरम्यान, बस अपघाताच्या प्रकरणात बसचालक संजय मोरे याला अटक करण्यात आली. चालक मोरे यांच्या कुटुंबीयांनी ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचा दावा केला होता. पण बसची तपासणी करताना आरटीओच्या पथकाला बसचे ब्रेक व्यवस्थित कार्य करत असल्याचे आढळले. यामुळे चालक संजय मोरे याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे आणि न्यायालयाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अपघातात सामील असलेला चालक संजय मोरे हा कंत्राटी चालक आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, त्याला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा फारसा अनुभव नव्हता. १ डिसेंबरपासून मोठी इलेक्ट्रिक बस चालवण्याची जबाबदारी त्याला तीन दिवसांचे प्रशिक्षण घेऊन देण्यात आली होती.

Previous Post

मुंबई पोलिसांची रिक्षा चालकांविरोधात विशेष मोहीम

Next Post

“मन्नत” ला मिळणार अजून भव्य स्वरूप, कोटींचा खर्च करणार शाहरुख

Next Post
“मन्नत” ला मिळणार अजून भव्य स्वरूप, कोटींचा खर्च करणार शाहरुख

"मन्नत" ला मिळणार अजून भव्य स्वरूप, कोटींचा खर्च करणार शाहरुख

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.