Lokrakshanay
Friday, June 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लोहगडावर फोटो काढताना तरुणाचा तोल गेला; ४५० फूट खोल दरीत पडून मृत्यू!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 19, 2026
in ताज्या बातम्या, पुणे
लोहगडावर फोटो काढताना तरुणाचा तोल गेला; ४५० फूट खोल दरीत पडून मृत्यू!
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर मित्रांसह ट्रेकिंगसाठी आलेल्या एका तरुणाचा फोटो काढताना तोल जाऊन सुमारे ४५० फूट खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुरुवारी १८ जून रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. केतन विशाल अग्रवाल (वय २६) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीमध्ये राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन मित्रांसोबत मोटारीने लोहगडावर ट्रेकिंगसाठी आला होता. किल्ल्यावर फिरत असताना एका कड्यावर उभे राहून छायाचित्रासाठी पोझ देताना त्याचा तोल गेला आणि तो खोल दरीत कोसळला. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेला अधिक वेदनादायी बनवणारी बाब म्हणजे केतनचे लग्न येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार होते. तसेच त्याच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस दुसऱ्याच दिवशी असल्याने या घटनेने दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. त्यानंतर शिवदुर्ग मित्र व वन्यजीव रक्षक मावळ यांच्या आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. पथकातील सदस्यांनी सुमारे ३ तास अथक प्रयत्न करत घनदाट झाडीतून मार्ग काढून दरीत अडकलेला मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर स्ट्रेचरच्या साहाय्याने मृतदेह गडाच्या पायथ्यापर्यंत आणण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.

 

Previous Post

बीकेसीच्या सार्वजनिक वाहतूक दिनाला बेस्ट संपाचा फटका; प्रवाशांची मोठी गैरसोय!

BreakingNews

लोहगडावर फोटो काढताना तरुणाचा तोल गेला; ४५० फूट खोल दरीत पडून मृत्यू!

बीकेसीच्या सार्वजनिक वाहतूक दिनाला बेस्ट संपाचा फटका; प्रवाशांची मोठी गैरसोय!

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! तब्बल ६ वर्षांनंतर दया, अभिजीत आणि एसीपी प्रद्युम्न पुन्हा एकत्र

साईभक्तांच्या श्रद्धेचा महापूर; शिर्डी साई संस्थानला वर्षभरात ६६० कोटींचे योगदान!

जी-७ परिषदेत मोदी-ट्रम्प भेट; भारताच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या पाठिंब्याची ग्वाही!

साकीनाक्यात एफडीएची धडक कारवाई; २,५१० लिटर संशयित चिली व सोया सॉस जप्त!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.