Lokrakshanay
Tuesday, August 4, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

डोंबिवलीहून सुरू होणार ई-वॉटर टॅक्सी सेवा; ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबईला जलद जोडणी!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 19, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
डोंबिवलीहून सुरू होणार ई-वॉटर टॅक्सी सेवा; ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबईला जलद जोडणी!
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि उपनगरी रेल्वेवरील प्रचंड गर्दी लक्षात घेता जलवाहतुकीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने आकार घेत आहे. डोंबिवली, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई तसेच दुसऱ्या मार्गाने डोंबिवली, दिवा ते नवी मुंबई विमानतळ अशा दोन जलमार्गांची आखणी करण्यात आली असून त्यासाठी डोंबिवलीतील मोठागाव येथे उभारण्यात येणाऱ्या जेट्टीचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. ठाण्यापुढील स्थानकांमधून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी मुंबईकडे प्रवास करतात. मात्र अपुऱ्या लोकल फेऱ्या आणि वाढत्या गर्दीमुळे अनेकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. या समस्येवर पर्याय म्हणून जलवाहतूक सेवा सुरू करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मेरीटाइम मंत्री असताना या प्रकल्पाला चालना दिली होती, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वॉटर टॅक्सी हा जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय ठरणार असल्याचे स्पष्ट केले होते.

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमातील महत्त्वाचा भाग असलेल्या या प्रकल्पामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास स्थानिक लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. पहिल्या टप्प्यात डोंबिवली ते ठाणे गायमुख दरम्यान जलप्रवास सेवा सुरू करण्याची तयारी सुरू असून लवकरच प्रकल्पाची पाहणी होणार आहे. मंत्री नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण स्वतः या प्रकल्पावर लक्ष ठेवून आहेत. प्रस्तावित ई-वॉटर टॅक्सी सेवा डोंबिवलीहून सुरू होऊन ठाणे, मीरा-भाईंदर, वसई या मार्गावर धावणार आहे. तसेच दुसऱ्या मार्गाने डोंबिवली, दिवा, ठाणे मार्गे थेट नवी मुंबई विमानतळाशी जोडणी केली जाणार आहे. प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक सुरक्षा चाचण्या पार पाडून ही सेवा प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे. मात्र तिकीट दरांबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Previous Post

लोहगडावर फोटो काढताना तरुणाचा तोल गेला; ४५० फूट खोल दरीत पडून मृत्यू!

Next Post

‘डॉन ३’ वादावर रणवीर सिंगचे मौन; पुढील १८ महिने मुलाखतींना नकार!

Next Post
‘डॉन ३’ वादावर रणवीर सिंगचे मौन; पुढील १८ महिने मुलाखतींना नकार!

‘डॉन ३’ वादावर रणवीर सिंगचे मौन; पुढील १८ महिने मुलाखतींना नकार!

BreakingNews

उत्तन-विरार सागरी सेतू थेट दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेला जोडणार!

जमीन मोजणीसाठी ई-पोस्ट प्रणाली सुरू; नोटिसा स्पीड पोस्टने थेट घरपोच

फ्रेंडशिप डे स्पेशल: युवा स्पंदनचा कौतुकास्पद उपक्रम; पोलीस आणि नागरिकांमधील मैत्रीचा धागा होणार घट्ट

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.