Lokrakshanay
Friday, April 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

यवत पोलीसांची कामगिरी; शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या ४ सराईत गुन्हेगारांना अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 7, 2025
in गुन्हेगारी, महाराष्ट्र
यवत पोलीसांची कामगिरी; शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या ४ सराईत गुन्हेगारांना अटक
Share on FacebookShare on Whatsapp

यवत : राज्यासह देशभरातील वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, धमक्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. दौंड तालुक्यातील पाटस, केडगाव, चौफुला परिसरात धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना यवत पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. महेश मनोज दुर्बे (वय २२ रा. फराटे गल्ली दौंड ता. दौंड जि. पुणे), महेश उर्फ मन्या संजय भागवत (वय २६ रा. पाटस तामखडा ता. दौंड जि. पुणे), पृथ्वी अशोक खंडाळे (वय २३ रा. इरीगेशन कॉलनी दौंड ता. दौंड, जि. पुणे ) आणि पोलीसांना हवा असलेला आदिनाथ ईश्वर गिरमे या चार सराईत गुन्हेगारांना यवत पोलीसांनी बुधवारी (दि.५) पावणे बारा वाजण्याच्या आसपास पळून जात असताना पाठलाग करुन ताब्यात घेतले.

पाटसचे ग्रामदैवत नागेश्वर महाराज यात्रा उत्सवाच्या अनुषंगाने यवत पोलिसांनी पाटसमध्ये ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. चौफुला येथील रेणुका कला केंद्रात पाटस येथील दोन गटात झालेल्या वादानंतर एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा आणि या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला सराईत आरोपी आदिनाथ ईश्वर गिरमे हा मारूती कंपनीच्या स्विप्ट कारमधून (क्र .एम एच/४२/एच/६२४१) पुणे- सोलापूर महामार्गावरुन पाटस आणि कुसेगाव बाजुकडे जाणार आहे, अशी खात्रीशीर माहिती यावेळी यवत पोलिसांना मिळाली होती. बंदोबस्तासाठी असलेले देवकर यांना माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने यांनी क्षणांचा विलंब न करता डी.बी. पथकाच्या मदतीने पाटस परिसरात पुणे- सोलापूर रोडच्या सेवा रस्त्यावर लाईटच्या उजेडात नाकाबंदी लावली. त्या ठिकाणी थांबून पुणे बाजुकडून येणारे वाहने चेक करत असताना पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी आदिनाथ गिरमे हा पोलिसांच्या ताब्यात मिळून येत नव्हता, पोलिसांनी गाडी थांबविली असता, त्याच्या ताब्यातील चारचाकी कार त्याने पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करुन सुपा बाजुकडे भरधाव वेगात निघून गेला. त्यानंतर पोलिसांनी या कारचा पाठलाग केला. कूसेगावच्या हद्दीत कारचा अपघात होऊन पलटी झाली. पोलिसांनी कारची तपासणी केल्यानंतर दोन लोखंडी कोयते आणि लाकडी दांडक्यासह ४ आरोपींना ताब्यात घेतले.

Previous Post

४२व्या वर्षी कतरिना झाली ‘आई’, चिमुकल्या पाहुण्याचे आगमन!

Next Post

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्यावर ६० कोटींची फसवणूक केल्याचा संशय

Next Post
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्यावर ६० कोटींची फसवणूक केल्याचा संशय

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्यावर ६० कोटींची फसवणूक केल्याचा संशय

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.