Lokrakshanay
Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 30, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ हा विशेष स्वच्छता उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे. श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, लोकसहभाग वाढविणे आणि स्वच्छ, सुंदर तसेच निरोगी गावांची निर्मिती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ग्रामपंचायत स्तरावर नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक, विद्यार्थी आणि विविध सामाजिक घटकांच्या सहभागातून सामूहिक श्रमदान आणि स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद ठाणे यांनी दिली आहे. गावातील सार्वजनिक परिसर, शाळा, रस्ते, चौक, बाजारपेठा, बसस्थानके, जलस्रोत परिसर तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, स्थानिक गरजेनुसार प्रत्येक गावात विशेष स्वच्छता उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. गावातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामपंचायतींसह नागरिकांनी सातत्याने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले आहे.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग) पंडित राठोड यांनी सांगितले की, या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागात स्वच्छतेची सवय, सार्वजनिक परिसराविषयी जबाबदारी आणि सामूहिक सहभागाची भावना अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या संकल्पनेनुसार प्रत्येक नागरिकाने किमान एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान केल्यास गावांचा स्वच्छतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होईल आणि स्वच्छ, सुंदर व निरोगी गावांच्या निर्मितीला गती मिळेल, असा संदेश या अभियानातून दिला जाणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक नागरिकांचा अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात आला असून, स्वच्छता ही सेवा २०२६ अभियान केवळ श्रमदानापुरते मर्यादित न राहता स्वच्छतेबाबत सामूहिक बांधिलकी निर्माण करणारा उपक्रम ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, युवक, महिला बचत गट आणि सामाजिक संस्थांनी १ ऑक्टोबर रोजी किमान एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करून ‘स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठाणे’ घडविण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद, ठाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

Next Post

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

Next Post
दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? 'त्या' कोडने अख्खे जग हादरले!

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.