Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

ऑनलाईन पार्सलच्या नावाखाली महिलेची ४ लाखांची फसवणूक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 18, 2025
in गुन्हेगारी, पुणे
ऑनलाईन पार्सलच्या नावाखाली महिलेची ४ लाखांची फसवणूक
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : ऑनलाईन पार्सलच्या नावाखाली एका महिलेची ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ऑनलाईन घडली होती. मात्र, याप्रकरणी १७ जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

महिंद्रा बँक खाते धारक, बँक ऑफ महाराष्ट्र खाते धारक आणि मोबाईल क्रमांक धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. तुम्हाला इराणला जाणारे पार्सल आहे, असे सांगून त्यात १५ किलो जनरिक मेडिकल आणि १५ ग्रॅम एमडी असल्याचे सांगितले. आरोपींनी फिर्यादी यांचा आधार कार्ड क्रमांक मागून स्काय ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यावर गणवेशातील दोन पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याने फिर्यादीचा विश्वास बसला. फिर्यादीचे आयसीआयसीआय बँक खाते इतर दोन व्यक्तींशी लिंक असून त्याद्वारे मनी लाँड्रिंग केली जात असल्याचे सांगण्यात आले. आयबीआय क्लिअरन्स आणि पोलीस व्हेरिफिकेशनसाठी आयसीआयसीआय बँकेच्या ॲपवर प्रक्रिया करण्यास सांगून त्यांच्या खात्यावर ४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज काढून महिंद्रा बँक खाते क्रमांक ०२४५३४७३८० आणि बँक ऑफ महाराष्ट्र खाते क्रमांक ६०५१३७२९८०७ या खात्यांवर प्रत्येकी दोन लाख रुपये असे एकूण चार लाख रुपये ऑनलाईन स्वीकारून फसवणूक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Previous Post

विधानभवनातील हाणामारीप्रकरणी राज ठाकरे यांचा प्रश्न, “काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची? कोणाच्या हातात दिला आहात महाराष्ट्र?”

Next Post

‘मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली’, निशिकांत दुबे यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

Next Post
‘मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली’, निशिकांत दुबे यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

‘मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली’, निशिकांत दुबे यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.