Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

विधानभवनातील हाणामारीप्रकरणी राज ठाकरे यांचा प्रश्न, “काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची? कोणाच्या हातात दिला आहात महाराष्ट्र?”

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 18, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
विधानभवनातील हाणामारीप्रकरणी राज ठाकरे यांचा प्रश्न, “काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची? कोणाच्या हातात दिला आहात महाराष्ट्र?”
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेवर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे म्हणाले, “काल विधान भवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची?’ सत्ता हे साधन असावं, साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, ‘कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?’ मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्यांच्यावर आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? जेव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं. माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता.

Previous Post

शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणूकीच्या नावाने ‘इतक्या’ लाखोंची फसवणूक

Next Post

ऑनलाईन पार्सलच्या नावाखाली महिलेची ४ लाखांची फसवणूक

Next Post
ऑनलाईन पार्सलच्या नावाखाली महिलेची ४ लाखांची फसवणूक

ऑनलाईन पार्सलच्या नावाखाली महिलेची ४ लाखांची फसवणूक

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.