Lokrakshanay
Saturday, July 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नववर्षापसून भीमाशंकर मंदिर होणार बंद? भाविकांना करावी लागणार ३ महीने प्रतिक्षा!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 26, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
नववर्षापसून भीमाशंकर मंदिर होणार बंद? भाविकांना करावी लागणार ३ महीने प्रतिक्षा!
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भीमाशंकर विकास आराखड्यांतर्गत मोठ्या प्रमाणात विकास कामे प्रस्तावित आहेत. त्याचा भाग म्हणून मंदिर सभामंडपाचे आणि दर्शन बारीच्या पायऱ्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये, भाविकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर अंदाजे तीन महिने बंद ठेवण्याच्या हालचाली प्रशासन पातळीवर सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. देशभरातून लाखो भाविक दररोज दर्शनासाठी येथे येतात. आगामी काळात नाशिक येथे कुंभमेळा होणार असल्याने २०२६ मध्ये भीमाशंकर येथेही भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून मंदिर आणि परिसरात भव्य स्वरूपात विकास कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये दर्शन रांगा, सभामंडप, सुविधा केंद्रे आणि मंदिर परिसराचा समावेश असणार आहे. या विकास कामांचा एक भाग म्हणून मंदिर सभामंडपाचे आणि दर्शन बारीच्या पायऱ्यांचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मंदिर काही काळ पूर्णतः बंद ठेवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. अद्याप मंदिर बंद ठेवण्याची अंतिम तारीख जाहीर झालेली नाही. मात्र, येत्या आठवडाभरात विकास कामांची पाहणी करण्यासाठी विशेष समिती भीमाशंकर येथे येणार आहे. त्यानंतर तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Previous Post

नववर्षाच्या आगमनाआधी हॉटेल्स, उपहारगृहांची तपासणी आवश्यक – मंत्री नरहरी झिरवाळ

Next Post

पुन्हा एकदा साडे माडे तीन : नव्या वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीस! रिलीज डेट जाहीर

Next Post
पुन्हा एकदा साडे माडे तीन : नव्या वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीस! रिलीज डेट जाहीर

पुन्हा एकदा साडे माडे तीन : नव्या वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीस! रिलीज डेट जाहीर

BreakingNews

हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; ७ डिसेंबरपासून नागपुरात रंगणार राजकीय रणसंग्राम!

‘शाळा बंद’ आंदोलन महागात; राज्यातील ८,६०० शिक्षकांचे वेतन कापणार!

तामिळनाडूत प्लास्टिक रिसायकलिंगला चालना; रिकामी प्लास्टिक बाटली दिल्यास मिळणार ५ रुपयांचा कॅशबॅक!

नवी मुंबई विमानतळ नामांतरण आंदोलन भोवले; २०० ते ३०० आंदोलकांवर पनवेल पोलिसांत गुन्हा!

‘सैराट २’ येणार का? नागराज मंजुळे यांची सिक्वेलबाबत स्पष्ट भूमिका

२० रुपयांच्या चोरीच्या आरोपामुळे ८वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; कुटुंबाचा शिक्षकांवर गंभीर आरोप!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.