Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पालिका प्रशासनाचा इशारा; नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणार

नाल्यामध्ये कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर यापुढे दंडात्मक कारवाई करण्याचा विचार पालिका प्रशासन करीत आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 21, 2023
in ताज्या बातम्या, मुंबई
बांधकामे रोखण्याचा आयुक्तांचा इशारा, उद्योग व व्यवसायांसाठी सूचना; बांधकामांबाबत पालिकेच्या सूचना
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : नाल्यामध्ये कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर यापुढे दंडात्मक कारवाई करण्याचा विचार पालिका प्रशासन करीत आहे. पालिकेने सध्या संपूर्ण मुंबईत स्वच्छता मोहीम हाती घेतली असून या मोहिमेदरम्यान स्वच्छता झाल्यानंतर मुंबईतील नाल्यांमध्ये नागरिकांकडून वारंवार कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कचऱ्यामध्ये थर्माकॉल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर, रॅपर्स अशा विविध प्रकारच्या तरंगत्या वस्तूंचा समावेश आहे. हा कचरा रोखण्यासाठी पालिकेने पुन्हा एकदा दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. झोपडपट्ट्यांमधून जाणाऱ्या नाल्यांमध्ये बऱ्याचदा कचरा भिरकावला जातो. त्यामुळे नाल्यांच्यावर कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या तरंगत असतात. दरवर्षी पावसाळ्यात हा कचरा काढण्यासाठी पालिका कोट्यवधी रुपये खर्च करीत असते. मात्र दररोज नाल्यात साचणारा कचरा पालिकेसाठी डोकेदुखी बनला आहे. नाले कचऱ्याने तुडुंब भरतात. परिसरात दुर्गंधी आणि डासांचा प्रादूर्भाव होतो. तसेच पावसाच्या पाण्याचा निचराही वेगाने होऊ शकत नाही. नाल्यांमध्ये फेकल्या जाणाऱ्या कचऱ्याला अटकाव करण्यासाठी पालिका प्रशासनाने आतापर्यंत अनेक उपाययोजना केल्या व आतापर्यंत केलेले सर्व उपाय फसले आहेत.

नाल्यावर सिमेंट कॉंक्रिटची आच्छादने केल्यानंतर त्यावर गाड्या उभ्या केल्या जातात. तसेच आच्छादनाच्या आत डासांची पैदास होत असे. तसेच आच्छादने तोडण्याचे प्रकारही अनेक ठिकाणी घडले आहेत. आच्छादनांमुळे नालेसफाई करता येत नव्हती. त्यानंतर पालिकेने घुमटाकार आच्छादने लावण्याचा पर्यायही आणला. पण मोठ्या रुंदीच्या नाल्यांना आच्छादने लावता येत नव्हती. जनजागृती केल्यानंतरही झोपडपट्ट्यांमधून कचरा फेकण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. जाळ्या लावल्या तरी त्या कापून आत कचरा टाकण्याची शक्यता असते. त्यामुळे हे सगळे उपाय आतापर्यंत फसले आहेत. आता पुन्हा एकदा पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार पालिका प्रशासनाने मुंबईत स्वच्छतेवर विशेष भर दिला आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत रस्ते, पदपथ, गटार आणि नाल्यांची स्वच्छता केली जात आहे. या मोहिमेत अवघ्या १५ दिवसांत एकूण १०४२ मेट्रिक टन राडारोडा (डेब्रीज), १३९ मेट्रिक टन घनकचऱ्याचे अतिरिक्त संकलन करण्यात आले आहे. त्यासाठी ३७०० कामगार – कर्मचाऱ्यांनी अविरत श्रमदान केले आहे. मनुष्यबळाबरोबरच जेसीबी (३३), डंपर (१४८), कॉम्पॅक्टर (२१), फायरेक्स मशीन (७१), वॉटर टँकर (६९), सक्शन मशीन (६), लिटर पीकर मशीन (३), रोड स्वीपिंग मशीन (९) आणि मिस्टिंग मशीन (७) याप्रमाणे एकूण ३६७ संयंत्रांचाही वापर करण्यात आला आहे.

नाल्यांमध्ये कचरा जाण्यापासून रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. नाल्यातून गाळ आणि कचरा बाहेर काढण्याचे काम नियमितपणे सुरू आहे. नाल्यांमध्ये येणाऱ्या कचऱ्यास प्रतिरोध करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन छोट्या नाल्यांच्या ठिकाणी जाळ्या लावता येतील का अथवा ते नाले बंदिस्त करता येतील का? तसेच मोठ्या नाल्यांच्या ठिकाणी स्क्रिनिंग किंवा नेटचा पर्याय वापरता येईल का? याबाबतची चाचपणी करण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी जाळी बसविण्यात आली आहे. नाल्याच्या नजिकच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी, नागरिकांनी नाल्यात थेट कोणताही कचरा न टाकता पालिकेला सहकार्य करावे. कचरा केवळ कचरा कुंडीतच टाकावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Previous Post

एका क्लिकवर कळणार कळवा रुग्णालयातील रुग्णांचा पुर्वइतिहास

Next Post

३० दिवसांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून ५२ लाखांची फसवणूक, आई वडील आणि मुलावर गुन्हा दाखल

Next Post
४३ हजार रुपयांची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याची फसवणूक, बीकेसी पोलिसांकडून तपास सुरू

३० दिवसांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून ५२ लाखांची फसवणूक, आई वडील आणि मुलावर गुन्हा दाखल

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.