मुंबई प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या कुटुंबाला बिश्नोई टोळीने पुन्हा एकदा धमकावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. यावेळी सलमानचे वडील सलीम खान यांना धमकी मिळाली आहे. सलीम खान घराजवळच्या उद्यानात बसलेले एक इसम व बुरखा परिधान केलेली महिला स्कूटरवरून त्यांच्या जवळ गेले. यावेळी महिलेने सलीम खान यांना लॉरेन्श बिश्नोई टोळीच्या नावाने धमकी दिली.
सलमानचे वडील सलीम खान हे नेहमीप्रमाणे बुधवारी (१८ सप्टेंबर) सकाळी देखील मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. वॉक करून ते घराजवळच्या उद्यानातील एका बाकावर जाऊन बसले होते. त्याचवेळी सलमानचं घर गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाजूने बँडस्टँडच्या दिशेने ७४४४ नंबर असलेली एक स्कूटर आली. या स्कूटरवर एक इसम व त्याच्या मागे एक बुरखा परिधान केलेली महिला बसली होती. या स्कूटरने यू टर्न घेतला आणि चालक ती स्टूकर घेऊन सलीम खान यांच्याजवळ गेला. त्यानंतर ती महिला सलीम खान यांना म्हणाली, “लॉरेन्स बिश्नोई को भेजूं क्या?”… अशी धमकी देत तेथून पळ काढला होता.
वांद्रे पोलिसांकडून महिलेला अटक
सलीम खान धमकी प्रकरणातील दोन्ही आरोपींना वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. ”लॉरेन्स बिश्नोई को भेजु क्या?” असे म्हणत बुधवारी सकाळी ही दुचाकीवरील ही जोडी वांद्रे परिसरातून फरार झाली होती. मात्र वांद्रे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत बाईक चालकाला अटक केली होती. यानंतर आता धमकी देणाऱ्या महिलेला देखील अटक केली आहे. अधिकचा तपास वांद्रे पोलिस करीत आहेत.