Lokrakshanay
Monday, April 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

वसई-विरारकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण! मिरा-भाईंदर थेट विरारशी जोडले जाणार; मेट्रो १३ मार्गिकेच्या कामाला होणार सुरुवात

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 25, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
वसई-विरारकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण! मिरा-भाईंदर थेट विरारशी जोडले जाणार; मेट्रो १३ मार्गिकेच्या कामाला होणार सुरुवात
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई शहरातून बरीच लोक अनेक उपनगरात कामानिमित्ताने जात असतात. ज्यात मुंबई ते पालघर जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. जर तुम्हीही मुंबईतून वसई-विरारला जाणार आहात तर हा प्रवास आता अतिशय सोपा आणि कमी वेळात पार होणार आहे पण हे कसे आणि कधीपासून शक्य होईल ते जाणून घ्या.

सध्या दहिसर ते मिरा-भाईंदरदरम्यान सुरू असलेल्या एमएमआरडीएच्या मेट्रो ९ मार्गिकेचा विस्तार आता मिरा-भाईंदर ते वसई-विरार असा मेट्रो १३ मार्गिकेद्वारे केला जाणार आहे. अनेक वर्षे केवळ कागदावर असलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. एमएमआरडीएच्या १६०व्या बैठकीत मेट्रो १३ च्या सुधारित संरेखनाला आणि आराखड्याला मान्यता देण्यात आली. नव्या आराखड्यानुसार या मार्गिकेची लांबी २५.०३ किमी असणार आहे. यापूर्वी ती २३ किमी प्रस्तावित होती. वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील प्रवासीसंख्या लक्षात घेऊन मार्गात बदल करण्यात आले आहेत. आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. मेट्रो २, २बी, ९ आणि १३ या मार्गिका एकमेकांशी जोडल्या गेल्यास मानखुर्द ते वसई-विरार असा सलग मेट्रो प्रवास शक्य होणार आहे. त्यामुळे वसई-विरारकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Previous Post

अजित पवार विमान अपघात प्रकरण: DGCA कडून ‘त्या’ कंपनीच्या ४ विमानांवर बंदी!

Next Post

कांदिवली वेस्ट मेट्रो स्टेशनचे नामांतर; ‘हम डेव्हलपर्स’च्या नावाचा लागणार बोर्ड!

Next Post
कांदिवली वेस्ट मेट्रो स्टेशनचे नामांतर; ‘हम डेव्हलपर्स’च्या नावाचा लागणार बोर्ड!

कांदिवली वेस्ट मेट्रो स्टेशनचे नामांतर; 'हम डेव्हलपर्स'च्या नावाचा लागणार बोर्ड!

BreakingNews

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.