Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

डोंबिवलीत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर; दंडात्मक कारवाई करण्याचा महापालिकेचा इशारा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 24, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
डोंबिवलीत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर; दंडात्मक कारवाई करण्याचा महापालिकेचा इशारा
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : सण, उत्सवांच्या काळात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेच्या डोंबिवली फ प्रभागाने आपल्या प्रभागातील दुकाने, खासगी आस्थापना, रस्त्यावरील विक्रेते यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. फ प्रभाग हद्दीतील बाजारपेठ विभागात अचानक भेटी देऊन साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दुकानात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दुकानदारांना दंड ठोठावला.

तसेच, प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्त केला. डोंबिवली पूर्व फडके रस्ता, नेहरू रस्ता, शिवमार्केट, चिमणी गल्ली आणि अंतर्गत रस्त्यांवरील दुकाने हा फ प्रभागातील परिसर बाजारपेठेचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील अनेक नागरिकांच्या हातांमध्ये सामान असलेल्या प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या आढळून येत असल्याचे फ प्रभाग साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे काही दुकानदार सर्रास या प्रतिबंधित पिशव्यांचा वापर करत असावेत असे लक्षात आल्याने. या पिशव्या दुकानदार कोणत्या प्लास्टिक वस्तू विक्री दुकानातून खरेदी करतात याची माहिती साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी काढली. काही दुकानदारांनी प्रतिबंधित प्लास्टिक वस्तू विक्री करणाऱ्या दुकान आणि व्यापाऱ्यांची नावे मुंबरकर यांना सांगितली. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या दुकानात विक्रीसाठी ठेवल्या म्हणून संबंधित दुकानदाराला पाच हजार रूपयांचा दंड पथकाने ठोठावला. अशाच पध्दतीने बाजारपेठेतील इतर दुकानांमध्ये गेल्यावर कारवाई पथकाला तेथेही प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. त्या दुकानदारावरही पाच हजार रूपये दंडाची कारवाई करण्यात आली. आणि पु्न्हा अशाप्रकारे प्रतिबंधित प्लास्टिक वस्तू, पिशव्या विक्रीसाठी ठेवल्या तर फौजदारी कारवाई केली जाईल, अशी तंबी दुकानदारांना देण्यात आली.

Previous Post

भारतीय जवानांसाठी डोंबिवलीच्या लोकसहभागातून दहा हजार दिवाळी फराळाचे डबे

Next Post

दुप्पट नफ्याच्या अमीषाने तरुणाची १२ लाखांची फसवणूक

Next Post
दुप्पट नफ्याच्या अमीषाने तरुणाची १२ लाखांची फसवणूक

दुप्पट नफ्याच्या अमीषाने तरुणाची १२ लाखांची फसवणूक

BreakingNews

साकीनाक्यात एफडीएची धडक कारवाई; २,५१० लिटर संशयित चिली व सोया सॉस जप्त!

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.