Lokrakshanay
Monday, August 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

मुंबईतील केईएम रुग्णालयातून दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण, तुतारी एक्स्प्रेसमधून आरोपीला अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 18, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
मुंबईतील केईएम रुग्णालयातून दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण, तुतारी एक्स्प्रेसमधून आरोपीला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मुंबईतील केईएम रुग्णालयातून दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण करुन त्याला तुतारी एक्स्प्रेसने घेऊन जाणाऱ्या अमोल उदलकर (४२) याला बुधवारी ठाणे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. अपहृत बालकाची सुखरुप सुटका करण्यात आली असून त्याला डोंबिवली येथील जननी आशिष संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. तर आरोपीला मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहे.

मुंबई येथील केईएम रुग्णालयातून दोन वर्षांच्या मुलाचे अपहण झाले असून एक व्यक्ती त्या मुलाला तुतारी एक्स्प्रेसने घेऊन जात असल्याची माहिती नियंत्रण कक्षातून ठाणे रेल्वे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, मध्यरात्री १२.४५ वाजता ठाणे रेल्वे स्थानकात तुतारी एक्स्प्रेस आल्यानंतर पोलीस पथकाला एक्स्प्रेसच्या एका डब्यामध्ये अपहृत मुलगा हा अमोल उदलकर याच्यासोबत आढळून आला. पोलिसांनी अमोल उदलकर याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, तो सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड भागातील रहिवासी असल्याचे उघड झाले. या अहरहणाप्रकरणी मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलिसांनी बालकाची वैद्यकीय तपासणी करुन त्याला डोंबिवली येथील जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेकडे सोपविले. तर उदलकर याला पुढील तपासासाठी भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Previous Post

ठाणे मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाची मोठी कामगिरी, वाळेकरांच्या हल्ल्याप्रकरणी १४ वर्षांनी आरोपीला अटक

Next Post

ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी; ‘मास्टर की’च्या मदतीने वाहनांची चोरी करणारा आरोपी गजाआड

Next Post
ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी; ‘मास्टर की’च्या मदतीने वाहनांची चोरी करणारा आरोपी गजाआड

ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी; ‘मास्टर की’च्या मदतीने वाहनांची चोरी करणारा आरोपी गजाआड

BreakingNews

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

पुण्यात ‘बर्गर किंग’सह १६ आस्थापनांना FDAचा दणका; किचनमधील अस्वच्छतेमुळे कारवाई

ठाण्यातील शतकमहोत्सवी ‘ऑफिसर्स क्लब’ला आधुनिकतेची झळाळी; स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन!

रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ! CSMT सह कल्याण, लोणावळा स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ बॅक्टेरिया

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.