Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

२५ घर मालकांवर तुळींज पोलिसांनी दाखल केले गुन्हे, परदेशी नागरिकांना भाड्याने घरे देणार्‍यांवर केली कारवाई

परदेशी नागरिकांना पोलिसांच्या परवानगीशिवाय परस्पर घरे भाड्याने देणार्‍यांविरोधात पोलिसांनी पुन्हा कारवाई सुरू केली आहे. नालासोपारा मधील तुळींज पोलिसांनी अशा प्रकरणात २५ घरमालकांविरोधात गुन्हे दाखल करून अटक केली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 26, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या
४ वर्ष देशमुख टोळीचा फरार आरोपी अखेर जेरबंद
Share on FacebookShare on Whatsapp

वसई : परदेशी नागरिकांना पोलिसांच्या परवानगीशिवाय परस्पर घरे भाड्याने देणार्‍यांविरोधात पोलिसांनी पुन्हा कारवाई सुरू केली आहे. नालासोपारा मधील तुळींज पोलिसांनी अशा प्रकरणात २५ घरमालकांविरोधात गुन्हे दाखल करून अटक केली आहे. मागील महिन्यात ११ घरमालकांविरोधात अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती. वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण होत आहे. विविध राज्यातील तसेच परदेशी नागरिक देखील विविध कारणांसाठी शहरात वास्तव्यासाठी येत आहेत. परदेशी नागरिकांमध्ये नायजेरीयन, बांग्लादेशी आणि इतर आफ्रिकन देशातील नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. अनेक गुन्ह्यांच्या प्रकरणाता परदेशी नागरिकांचा सहभाग आढळून आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ते देशात प्रवेश करून वास्तव्य करत असतात. त्यामुळे घरे भाड्याने देताना पोलिसांचा ‘ना हरकत दाखला’ घेणे बंधनकारक करण्यात आले होते. याशिवाय परदेशी नागरिकांना घरे देताना ‘सी’ फॉर्म भरून पोलिसांचा ना हरकत दाखला घ्यावा लागत होता.

मात्र अनेक परदेशी नागरिक पोलिसांच्या अशा दाखल्याशिवाय रहात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे अशा परदेशी नागरिकांना घरे देणार्‍यांविरोधातही पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. तुळींज पोलिसांनी अशा प्रकरणात एकूण ११ घरमालकांविरोधात कारवाई केली आहे. विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम ७ अन्वये कोणत्याही परदेशी नागरिकांना घर भाड्याने देताना २४ तासांच्या आत पोलिसाना कळवणे बंधनकारक असतं. त्यामुळे अशी माहिती दडवून ठेवणार्‍यांना भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १८८, रिपोर्ट टू पोलीस ऑर्डर १९७१ च्या नियम २ अन्वये, तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ च्याकमल १४ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. मार्च महिन्यात देखील तुळींज पोलिसांनी अशाप्रकारे परदेशी नागरिकांना घरे देणार्‍या ११ जणांवर गुन्हेदाखल केले होते. त्यांच्यावर दोषारोपत्र दाखल केल्याने त्याना शिक्षा आणि दंड होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना माहिती न देता परदेशी नागरिकांना घरे देणार्‍या घरमालकांविरोधात आम्ही कारवाई सुरू केलेली आहे. यातील बहुतांश परेदशी नागरिक हे नायजेरीयन देशातील आहेत, असे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितल. सध्या शहरात मनाई आदेश लागू केले आहेत. त्यानुसार घरात भाडेतत्वावर, तसेच हॉटेल, लॉजेस, क्लब, गेस्ट हाऊस इत्यादी ठिकाणी परदेशी नागरीक आल्यास त्यांची माहिती विहित प्रपत्रामध्ये २४ तासांच्या आत पोलिसांना देणे बंधनकारक आहे.

Previous Post

टोलमाफी द्या, अन्यथा ‘नोटा’ पर्याय वापरणार; मुलुंड पूर्वेतील हरिओम नगर मधील नागरिकांचा सरकारला इशारा

Next Post

कोस्टल रोडच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुंबईत देशातील सर्वात मोठ्या गर्डरची जोडणी यशस्वी

Next Post
कोस्टल रोडच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुंबईत देशातील सर्वात मोठ्या गर्डरची जोडणी यशस्वी

कोस्टल रोडच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुंबईत देशातील सर्वात मोठ्या गर्डरची जोडणी यशस्वी

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.