Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

कोस्टल रोडच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुंबईत देशातील सर्वात मोठ्या गर्डरची जोडणी यशस्वी

मुंबईतील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 26, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
कोस्टल रोडच्या शिरपेचात मानाचा तुरा; मुंबईत देशातील सर्वात मोठ्या गर्डरची जोडणी यशस्वी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईतील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुंबईतील कोस्टल रोड वरून थेट वरळी सी-लिंकवर प्रवास करता यावा, यासाठी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. वरळी सी-लिंकला जोडण्यासाठी पिलर ७ आणि ९ च्या मध्ये देशातील सर्वांत मोठा आणि ३० बोइंग जेट वजना इतका दोन हजार टनांचा ‘बो आर्क गर्डर’ यशस्वीरित्या बसवण्यात आला आहे. संपूर्ण स्टील बनावटीचा असलेला हा गर्डर समुद्र मार्गे वरळीच्या समुद्रात आणण्यात आला. अरबी समुद्रात भरती व ओहोटीचा ताळमेळ राखत शुक्रवारी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी या गर्डरचे पिलरला जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. पुढील १०० वर्ष टिकेल इतका मजबूत गर्डर असल्याचे पालिकेने सांगितले आहे. १३६ मीटर लांब असलेल्या या गर्डरमुळे कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी-लिंक अंतर जोडले जाणार असून दक्षिणेकडील बाजूच्या चार लेन सज्ज होतील.

प्रियदर्शनी पार्क ते वरळी दरम्यान कोस्टल रोड मे अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी वेगाने काम सुरू आहे. कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी-लिंक जोडण्यासाठी दोन हजार टन वजनाचा गर्डर बसविण्यात आला आहे. कोस्टल रोड आणि सी लिंकदरम्यान तयार होणाऱ्या पुलाचे अंतर ८५० मीटर रुंद आणि २७० मीटर रुंद आहे. त्यामुळे वरळी येथे कोस्टल रोडला सी-लिंकची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामुळे वांद्रे येथून दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनांना सध्या सी लिंक वरळीला जिथे संपतो तिथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही.

Previous Post

२५ घर मालकांवर तुळींज पोलिसांनी दाखल केले गुन्हे, परदेशी नागरिकांना भाड्याने घरे देणार्‍यांवर केली कारवाई

Next Post

परिवहन विभागाकडून तपासणी सुरू; पालघर लोकसभा निवडणुकीसाठी साडेआठशेहून अधिक वाहने

Next Post
परिवहन विभागाकडून तपासणी सुरू; पालघर लोकसभा निवडणुकीसाठी साडेआठशेहून अधिक वाहने

परिवहन विभागाकडून तपासणी सुरू; पालघर लोकसभा निवडणुकीसाठी साडेआठशेहून अधिक वाहने

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.