Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

माउंट मेरी जत्रेत चोरांचा सुळसुळाट; पहिल्याच दिवशी १२ चोरांना रंगेहाथ अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 16, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
माउंट मेरी जत्रेत चोरांचा सुळसुळाट; पहिल्याच दिवशी १२ चोरांना रंगेहाथ अटक

one hand reaches for a purse in the back pocket

Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : माउंट मेरी जत्रा रविवारपासून सुरुवात झाली. जत्रेच्या पहिल्याच दिवशी चोरी आणि पाकिटमारी करणाऱ्या १२ चोरांना वांद्रे पोलिसांच्या विशेष पथकाने रंगेहाथ अटक केली. या जत्रेच्या वेळी होणाऱ्या गर्दीच्या फायदा घेऊन चोर सक्रिय होतात. त्यामुळे पोलिसांनी खास पथक तयार केले आहे. मदर मेरीच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी मुंबईच्या वांद्रे येथे माऊंट मेरीची जत्रा आयोजित करण्यात येते. ही जत्रा दरवर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या रविवारी सुरू होते आणि एक आठवडा चालते. या जत्रेदरम्यान मुंबई तसेच महाराष्ट्रातील आणि देश-विदेशातील लाखो भाविक वांद्र्यात येतात. या काळात माऊंट मेरी बॅसिलिका आणि आसपासचा परिसर रोषणाई, मेणबत्त्या, फुले आणि भक्तगणांनी गजबजलेला असतो. रविवार १४ सप्टेंबरपासून या यात्रेला सुरवात झाली. या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही समाजकंटक व सराईत चोर पाकिटमारी आणि मोबाइल चोरी करतात. यामुळे भुरट्या चोरांना रोखण्यासाठी परिमंडळ- ९ मधून विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाला जत्रा परिसरावर सतत लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

माऊंट मेरी जत्रेचा रविवारी पहिला दिवस होता. पोलिसांचे पथक साध्या कपड्यात गर्दीत मिसळून लक्ष ठेवत होते. यावेळी गर्दीत चोरी कऱणाऱ्या १२ जणांना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यात ९ पुरूष आणि ३ महिला आरोपींचा समावेश आहे. या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमान्वये ९ वेगवेगळे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. जत्रा आठवडाभर चालणार असून हे विशेष पथक आठवडाभर या परिसरात अशाच प्रकारे कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी साेंगितले. या जत्रेत प्रचंड गर्दी असते. त्यामुळे गर्दीचा फायदा घेत फेस्टिवल चोर सक्रिय होतात. यासाठी ते देशाच्या विविध भागातून मुंबईत येतात, असेही पोलिसांनी सांगितले.

Previous Post

तोतया पोलिस बनून ७० वर्षीय वृध्दाला लुटले

Next Post

ठाणे, डोंबिवली परिसरातील ७० महिला शिक्षिकांना ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’

Next Post
ठाणे, डोंबिवली परिसरातील ७० महिला शिक्षिकांना ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’

ठाणे, डोंबिवली परिसरातील ७० महिला शिक्षिकांना ‘आदर्श शिक्षिका पुरस्कार’

BreakingNews

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

१ मेपासून एसटी बसमध्ये ‘जय महाराष्ट्र’ने स्वागत!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.