आरोग्य : शेंगदाणे आरोग्यासाठी पौष्टिक असतात. गरिबांचा बदाम म्हणून ओळखले जाणारे शेंगदाणे प्रत्येकाच्या आरोग्यासाठी पौष्टिक आहेत. पण अनेकदा हेच शेंगदाणे काहींच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात. शेंगदाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन आढळून येते. त्यामुळे जेवणातील इतर पदार्थ बनवण्यासाठी शेंगदाण्याचा वापर केला जातो. अनेकदा संध्याकाळच्या वेळी किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर शेंगदाणे खाल्ले जातात. पण हेच कच्चे शेंगदाणे खाल्ल्यानंतर अनेकांना त्रास होण्यास सुरुवात होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या व्यक्तींनी दैनंदिन आहारात शेंगदाण्याचे सेवन करू नये, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात चुकूनही शेंगदाण्याचे सेवन करू नये. शेंगदाणे खाल्ल्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. घरी शेंगदाणे खाल्ल्यानंतर ते मिठात भाजून किंवा मिठाच्या पाण्यात शिजवून खाल्ले जातात. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींच्या शरीरातील रक्त वाहिन्या अरुंद होण्याची शक्यता असते.
काहींना शेंगदाणे खाल्ल्यानंतर ऍलर्जी होते. अशावेळी खाज सुटणे, पुरळ येणे, सूज येणे, अतिसार, उलट्या होणे, मळमळ होणे, पोटदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, घरघर येणे, छातीत घट्ट होणे, नाक वाहणे, डोळ्यांमधून पाणी येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या समस्या जाणवू लागल्यास शेंगदाण्याचे सेवन करू नये.
शेंगदाणे खाल्ल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम : यूरिक ऍसिडच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी रोजच्या आहारात शेंगदाणे युक्त पदार्थांचे सेवन करू नका. शेंगदाणे खाल्ल्यामुळे शरीरात युरिक ऍसिड वाढण्याची शक्यता असते. यामुळे सांधेदुखी, हातापायांमध्ये मुंग्या येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. शेंगदाण्याचे सेवन केल्यामुळे संधिवाताचा त्रास आणखीन वाढण्याची शक्यता असते. ज्या लोकांनी पचनसंबंधित समस्या आहेत, अशांनी शेंगदाण्याचे सेवन करू नये. शेंगदाणे खाल्ल्यामुळे अपचन, असिडिटी, पोटात दुखणे इत्यादी इत्यादी अनेक समस्या जाणवतात.