Lokrakshanay
Wednesday, April 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home कोकण

गुहागर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून विपुल कदम उमेदवार असण्याची शक्यता

विपुल कदम हे खासदार श्रीकांत शिंदे यांचा मेहुणे असून त्यांची गुहागरमधून उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची सूत्रांची माहिती आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 30, 2024
in कोकण, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, रत्नागिरी
गुहागर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून विपुल कदम उमेदवार असण्याची शक्यता
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी : सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. ही सगळी चर्चा सुरु असताना भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मानस व्यक्त केलेला आहे.

गेल्या काही महिन्यात निलेश राणे यांचे गुहागरमधील दौरे वाढले होते. त्यांची गुहागरमधील सभाही प्रचंड गाजली होती. तेव्हापासूनच निलेश राणे हे गुहागर विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भास्कर जाधव यांचा विजय झाला होता. त्यामुळे ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवरुन श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मेहुण्याला रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु केली आहे.

श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम हे यंदा गुहागरमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असू शकतात. विपुल कदम हे खेडमधील तळे गावचे रहिवासी आहेत. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गुहागरमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत गुहागर विधानसभेसाठी विपुल कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. पितृपक्ष संपल्यानंतर शिंदे गटाकडून विपुल कदम यांच्या नावाची घोषणा होईल, असं सांगितले जातं. तसं घडल्यास निलेश राणे यांचे गुहागरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगणार आहे. त्यामुळे राणे कुटुंबीय आणि भाजप पक्षाकडून विपुल कदम यांच्या उमेदवारीबाबत काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल.

खासदार श्रीकांत शिंदे यांचा मेहुणा विपुल कदम यांची गुहागरमधून उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची माहिती काही समोर येत आहे. विपुल कदम रिंगणात उतल्यास गुहागरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगेल. याठिकाणी ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचवेळी भाजपकडून माजी आमदार विनय नातू हे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विपुल कदम यांच्या उमेदवारीमुळे या जागेवरुन भाजप आणि शिंदे गटात पेच निर्माण होऊ शकतो.

 

Previous Post

आगीत जळून भस्मसात झालेल्या अलिबागच्या पीएनपी नाट्यगृहाला नवी झळाळी प्राप्त होणार

Next Post

‘या’लोकांनी चुकूनही शेंगदाण्याचे सेवन करू नये, आरोग्यासाठी ठरू शकत घातक

Next Post
‘या’लोकांनी चुकूनही शेंगदाण्याचे सेवन करू नये, आरोग्यासाठी ठरू शकत घातक

'या'लोकांनी चुकूनही शेंगदाण्याचे सेवन करू नये, आरोग्यासाठी ठरू शकत घातक

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.