Lokrakshanay
Friday, October 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

कोणताही ‘अपवाद’ नाही! केजरीवाल यांच्या जामिनाबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

‘‘त्यांनी (केजरीवालांनी) कधी शरणागती पत्करायची आहे, याबाबत आमचे आदेश स्पष्ट आहेत. हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. या आदेशाला अनुसरून कायदा काम करेल.’’ – सर्वोच्च न्यायालय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 18, 2024
in ताज्या बातम्या, देश -विदेश
कोणताही ‘अपवाद’ नाही! केजरीवाल यांच्या जामिनाबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली प्रतिनिधी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देताना कोणताही अपवाद करण्यात आलेला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. या निर्णयासंदर्भात होत असलेल्या राजकीय दावे-प्रतिदाव्यांवर कोणतेही भाष्य करण्यास न्यायालयाने नकार दिला.
दिल्ली मद्याघोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेवर गुरुवारी न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी ‘‘लोकांनी आम आदमी पक्षाला मते दिली, तर २ जूनला मला पुन्हा तुरुंगात जावे लागणार नाही,’’ असा दावा केजरीवाल प्रचारसभांमध्ये करीत असल्याचे महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनी सांगितले. त्यावर ‘हे त्यांचे गृहीतक आहे, त्यावर आम्ही काही भाष्य करू शकत नाही,’ असे न्यायालयाने सांगितले. या प्रकरणावर भाष्य करण्यास केजरीवाल यांना मनाई करण्यात आली नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
दुसरीकडे केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नाव न घेता त्यांच्या एका विधानाचा संदर्भ दिला. न्यायालयाने केजरीवाल यांना विशेष वागणूक दिली आहे, असे अनेकांना वाटत असल्याचे सिंघवी म्हणाले. त्यावर आपण याच्या अधिक तपशिलात जाऊ इच्छित नाही, असे न्यायालयाने सांगितले. केजरीवाल यांनी आपल्या तुरुंगात जाण्याबाबत कोणतेही भाष्य केलेले नसून ते तसेच प्रतिज्ञापत्र देण्यासही तयार असल्याचे सिंघवी यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील अबकारी कर घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री केजरीवाल आणि आम आदमी पक्षाविरोधात आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती ईडीने दिली. याबाबत कार्यवाही सुरू असून लवकरच आरोपपत्र दाखल केले जाईल, असे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता एस. व्ही. राजू यांनी स्पष्ट केले.

Previous Post

भाजपला पुन्हा संधी मिळाल्यास सर्वांचा मतदानाचा अधिकार संकटात – शरद पवार

Next Post

भावेश भिंडेला २६ मेपर्यंत पोलीस कोठडी; होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे

Next Post
भावेश भिंडेला २६ मेपर्यंत पोलीस कोठडी; होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे

भावेश भिंडेला २६ मेपर्यंत पोलीस कोठडी; होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे

BreakingNews

२ ऑक्टोबरपासून मुंबईत डिजिटल आरोग्य क्रांती; लाखो नागरिकांचे ‘आभा’ कार्ड तयार करण्याचे पालिकेचे लक्ष्य!

पावसाच्या कमतरतेचा फटका; किरकोळ बाजारात एक लिंबू १० रुपयांना!

१ ऑक्टोबर उजाडला आणि नियम बदलला! आता मालमत्तेच्या व्यवहारासाठी ‘हे’ कार्ड बंधनकारक; सरकारने काय आदेश दिला?

अर्थमंत्र्यांच्या ‘त्या’ आश्वासनाने व्यापाऱ्यांचा युटर्न; २ ऑक्टोबरचा ‘नो UPI डे’ रद्द!

शुभमन गिलचा विश्वविक्रमांचा धडाका! २२३ धावांच्या वादळी खेळीने भारताचा विक्रमी विजय

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.