Lokrakshanay
Sunday, April 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

परदेशी निधी घेणाऱ्या स्वयंमसेवी संस्था(NGO)वर केंद्रीय मंत्रालय कारवाई करणार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 12, 2024
in ताज्या बातम्या, देश -विदेश, नवी दिल्ली, राष्ट्रीय
परदेशी निधी घेणाऱ्या स्वयंमसेवी संस्था(NGO)वर केंद्रीय मंत्रालय कारवाई करणार
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : देशातील विकास प्रकल्पा विरोधातील भूमिका, धर्मांतर किंवा द्वेषपूर्ण हेतूने निदर्शने, चिथावणी देणाऱ्या किंवा दहशतवादी किंवा कट्टरपंथी गटांशी संबंध असलेल्या कोणत्याही स्वयंसेवी संस्थेचा एफसीआरए परवाना रद्द करण्यातची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. गृह मंत्रालयाने सोमवारी आपल्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केलेल्या नोटीशीमध्ये म्हटले आह की, ज्या स्वयंसेवी संस्थांनी परदेशी निधी स्वीकारल्याने सामाजिक सामाजिक सलोख्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो किंवा या निधीचा वापर प्रेरित किंवा बळजबरीने धर्मांतर करण्यासाठी केला जात असेल अशा संस्थांची परदेशी योगदान (नियमन) अधिनियम (एफसीआरए), २०१० अंतर्गत नोंदणी रद्द केली जाईल.

मंत्रालयाने म्हटले आहे की, जर एखादी स्वयंसेवी संस्था आपली उद्दिष्टे आणि उद्दिष्टांनुसार परदेशी निधीचा वापर करण्यात अपयशी ठरली असेल किंवा वार्षिक विवरणपत्र सादर केली नसेल तर अशा संस्थांची देखील एफसीआरए नोंदणी रद्द केली जाईल. कायद्यानुसार परदेशी निधी मिळण्यासाठी स्वयंसेवी संस्थेची परदेशी योगदान (नियमन) कायद्यांतर्गत नोंदणी करणे बंधनकारक आहे. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, एखाद्या स्वयंसेवी संस्थेने गेल्या दोन-तीन वर्षांत सहभाग घेतला नसेल किंवा निष्क्रिय झाला नसेल किंवा संस्थेच्या कल्याणासाठी केलेल्या कामांची खातरजमा केली जात नसेल तर त्याची एफसीआरए नोंदणी देखील रद्द केली जाऊ शकते.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एफसीआरए परवाना रद्द करण्याच्या इतर कारणांमध्ये कोणत्याही पदाधिकारी, सदस्य किंवा प्रमुख पदाधिकाऱ्याविरुद्ध विचारण्यात आलेल्या स्पष्टीकरणाला प्रतिसाद न दिल्याबद्दल किंवा संधी देऊनही आवश्यक माहिती किंवा कागदपत्रे सादर न केल्याबद्दल खटला प्रलंबित आहे, अशा संस्थांचा देशील एफसीआरए परवाना रद्द केला जाऊ शकतो.

जर एखाद्या स्वयंसेवी संस्थेने परदेशी निधीचा वापर विकासविरोधी कारवाया करण्यासाठी किंवा द्वेषपूर्ण हेतूने आंदोलने भडकवण्यासाठी केला असेल किंवा क्षेत्रीय तपासणीत संस्थेला किंवा त्याच्या पदाधिकाऱ्यांना लाभ मिळाला असेल किंवा परकीय देणगी ही चुकीच्या कामासाठी वापरली गेल्याचे दिसून आले असेल तेव्हा अशी कारवाई केली जाऊ शकते, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. दहशतवादी संघटना किंवा देशविरोधी घटकांशी संबंध असल्याच्या बाबतीत त्यांची एफसीआरए नोंदणी रद्द केली जाईल, असे देखील या नोटीसीत म्हटले आहे. कोणत्याही तपास यंत्रणेने कोणत्याही स्वयंसेवी संस्थेचा पूर्वग्रहदूषित कारवायांमध्ये सहभाग असल्याची माहिती दिल्यास किंवा मिळालेल्या परकीय निधीमुळे सामाजिक, धार्मिक सलोख्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केल्यास त्याचा एफसीआरए परवानाही रद्द करण्यात येईल, असे या नोटिशीत म्हटले आहे.

स्वयंसेवी संस्थेने प्रकल्पांसाठी प्राप्त झालेल्या परकीय निधीचा वापर आपल्या उद्दिष्टांनुसार न करणे, गेल्या सहा आर्थिक वर्षांपैकी एकाही आर्थिक वर्षाचा वार्षिक परतावा अपलोड न करणे आणि समाजाच्या कल्याणासाठी गेल्या तीन आर्थिक वर्षांत आपल्या मुख्य उपक्रमांसाठी किमान १५ लाख रुपये खर्च करण्याचे निकष पूर्ण न केल्याने एफसीआरए परवाना रद्द केला जाऊ शकतो.

 

Previous Post

उल्हासनगरात भरारी पथकातील ५ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल

Next Post

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या कार्तिक एकादशीनिमित्त महापूजेचा मान मिळाला वारकरी सगर दाम्पत्याला

Next Post
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या कार्तिक एकादशीनिमित्त महापूजेचा मान मिळाला वारकरी सगर दाम्पत्याला

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या कार्तिक एकादशीनिमित्त महापूजेचा मान मिळाला वारकरी सगर दाम्पत्याला

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.