Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

हरियाणात भाकरी फिरल्याचे चित्र, हरियाणात पुन्हा फुललं कमळ..!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 8, 2024
in ताज्या बातम्या, नवी दिल्ली, राष्ट्रीय
हरियाणात भाकरी फिरल्याचे चित्र, हरियाणात पुन्हा फुललं कमळ..!
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी सुरू असून भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची लढत आहे. मात्र, हरियाणात भाकरी फिरल्याचे चित्र दिसत आहे. एक्झिट पोलचे अंदाजही फोल ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या अर्धातासात काँग्रेसने मोठी मुसंडी मारली होती.आघाडीत बहुमताचा आकडा देखील काँग्रेसने पार केला होता. इतकंच नाही तर काँग्रेसच्या दिल्लीच्या मुख्यालयात मिठाई वाटप करण्यात आले. मात्र, नंतर ट्रेंड बदलला आणि भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला. सध्या भाजपने एकूण 90 जागांपैकी 50 जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे.  हरियाणात राज्यात सध्या भाजपच सरकार आहे. आतापर्यंतचे निकालाचे आकडे पाहाता भाजप हॅटट्रिक करून हरिणाात इतिहास रचणार असेल राजकीय क्षेत्रातील जाणकरांनी मत व्यक्त केलं आहे.

हरियाणा विधानसभेसाठी 5 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले. बहुतांश एक्झिट पोल्सनी हरियाणात काँग्रेसच्या बाजुने कौल दिला होता. तर भाजपला पराभव स्वीकारावा लागेल, असाही अंदाज वर्तवला होता. काँग्रेसला 50-65 जागा मिळतील तर भाजपला केवळ 30 जागांवर समाधान मानावं लागेल, असेही बोललं जात होतं. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास आणखीनच बळावला होता. मात्र, हरियाणात एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरल्याचं दिसत आहे. हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याकडे वाटचाल करत आहे.
दरम्यान, हरियाणा राज्यात याआधी भाजपने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला होता.सन 2014 आणि त्यानंतर 2029 मध्ये भाजपने सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन केलं होतं. त्याआधी सन 2005 आणि 2009 मध्ये काँग्रेसला हरियाणात सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली होती. त्यापूर्वी 1968 आणि 1972 मध्येही काँग्रेसचेच सरकार होते. मात्र, आता 15 व्या विधानसभा निवडणुकीत हरियाणातील जनतेने पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवला आहे. भाजपचा सरकार स्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे दिसत आहे.

Previous Post

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा नेमबाज स्वप्नील कुसळेच्या वडिलांनी पुरस्काराच्या रकमेबद्दल व्यक्त केली निराशा

Next Post

सांगलीतर्फे विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर

Next Post
सांगलीतर्फे विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर

सांगलीतर्फे विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.