Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

महापालिकेच्या यंत्रणेमार्फत ठाण्यात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातोय मतदानाचा संदेश

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अधिकाधिक नागरिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पोहोचवण्यात येत आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 13, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
महापालिकेच्या यंत्रणेमार्फत ठाण्यात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातोय मतदानाचा संदेश
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : लोकसभेच्या निवडणुकीत २० मे रोजी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे याबद्दल ठाणे महानगरपालिका विविध उपक्रमांमधून जागृती करत आहे. याच उपक्रमात ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रत्येक प्रयोगाच्या आधी मतदान करण्याबद्दलचा संदेश दिला जात आहे. त्यामुळे हजारो नाट्यरसिकांना मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव करून दिली जात आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अधिकाधिक नागरिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पोहोचवण्यात येत आहे. गडकरी रंगायतनची आसन क्षमता एक हजार प्रेक्षकांची आहे. तेथे दररोज किमान दोन नाटकांचे प्रयोग होतात. शनिवार-रविवारी हे प्रमाण तीन प्रयोगापर्यंत जाते. तर, घाणेकर नाट्यगृहाची आसनक्षमता ११०० प्रेक्षकांची आहे. येथे दररोज किमान एक प्रयोग होतो तर, शनिवार-रविवारी किमान दोन प्रयोग होतात. घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्येही प्रयोग होतात. या प्रयोगांना येणाऱ्या हजारो रसिकांच्या माध्यमातून त्यांना आणि त्यांच्यामार्फत त्यांच्या कुटुंबियांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहोचवण्यात येत आहे.

जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेद्वारेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडिया, आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमातंर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलेला आहे. त्याचबरोबर, मिनी मॅरेथॉन आणि फ्लॅश मॉबच्या माध्यमातूनही मतदान जागृतीचा संदेश देण्यात आला आहे.

Previous Post

सीमाशुल्क विभागाची कारवाई, आरोपींमध्ये तीन परदेशी महिला; पावणे सहा कोटींच्या सोन्यासह चौघांना अटक

Next Post

पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; एका मागोमाग एक लोकल थांबल्या

Next Post
पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; एका मागोमाग एक लोकल थांबल्या

पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; एका मागोमाग एक लोकल थांबल्या

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.