मुंबई : अवकाळी पावासाचा मुंबई लोकल सेवेला मोठा फटका बसला आहे. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. एका मागोमाग एक लोकस थांबल्या आहेत. यामुळे हजारो प्रवासी अडकले. कामावपुन घरी निघालेल्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सीएसएमटीवरून ठाण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. तब्बल २० मिनटे लोकसल सायन आणि कुर्ल्याच्या मध्येच थांबली होती. भायकळा, दादर, कुर्ला, घाटकोपर तसेच सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली.
मुंबईत अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा कोलमडली होती. मात्र तब्बल ४५ मिनिटानंतर वाहतूक सुरू झाली. धीम्या डाऊन मार्गावरील वाहतूक माटुंग्यापासून जलद मार्गावर वळवण्यात आली. ऐन ऑफिस सुटण्याच्या वेळी मध्य रेल्वे विस्कळीत झाल्यानं घरी परतणा-या मुंबईकरांचा खोळंबा झाला. वाहतूक ठप्प झाल्यानं ४५ मिनिटं डाऊन मार्गावरील लोकल एकाच ठिकाणी उभ्या होत्या. हजारो रेल्वे प्रवाशी लोकलमध्ये अडकून पडले. अखेर ४५ मिनिटांनी हळुहळु मध्य रेल्वे पूर्वपदावर येत आहे. मात्र, लोकल उशीरा धावत आहेत.