Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लोकलचे वेळापत्रक कोलमडले; माटुंगा येथे रेल्वे रुळाला तडा

मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाजवळ शुक्रवारी रेल्वे रुळाला तडा गेला.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 12, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
पाच महिन्यांत ५८१ जण जखमी, १९ जण बेपत्ता; लोकलमधील गर्दीचे २५६ बळी!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मध्य रेल्वेचा लेटलतीफ कारभार नित्याचा झाला आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांना प्रवास करताना दररोज विलंब होत आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाजवळ शुक्रवारी रेल्वे रुळाला तडा गेला. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले. माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन दिशेला जाणाऱ्या धीम्या रेल्वे मार्गाच्या रुळाला शुक्रवारी दुपारी १.०५ वाजेच्या सुमारास तडा गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दोन्ही दिशेकडील लोकल सेवा खोळंबली. या घटनेमुळे लोकलचा वेग मंदावला.

संबंधित घटनेची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळताच, लोकल भायखळ्यावरून जलद डाऊन दिशेने वळवण्यात आल्या. त्यामुळे सीएसएमटीपासून कल्याणपर्यंत अप आणि डाऊन लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यानंतर, माटुंगा येथे रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुपारी १.३९ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. मात्र यामुळे धीम्या मार्गावरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. प्रवाशांना तब्बल २० ते ३० मिनिटे लोकल उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

Previous Post

ऑनलाईन गुंतवणुकीच्या माध्यमातून डोंबिवलीतील नोकरदाराची सतरा लाखाची फसवणूक

Next Post

आषाढीनिमित्त एसटी प्रवाशांना सवलती लागू

Next Post
आषाढीनिमित्त एसटी प्रवाशांना सवलती लागू

आषाढीनिमित्त एसटी प्रवाशांना सवलती लागू

BreakingNews

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.