Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आषाढीनिमित्त एसटी प्रवाशांना सवलती लागू

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 13, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
आषाढीनिमित्त एसटी प्रवाशांना सवलती लागू
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत पंढरपूरला जाणाऱ्या भाविक – प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने पाच हजार विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या बसमध्ये ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्यापेक्षा जास्त भाविक, प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी भाविक, प्रवाशांनी जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. यावर्षी पावसाची शक्यता असून प्रवाशांसाठी बसस्थानकावर सोयी-सुविधा उपलब्ध कराव्या, बस चिखलात अडकून पडणार नाही अशा पद्धतीने त्या उभ्या कराव्या. तसेच एसटी बसमुळे वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर जादा वाहतुकीसाठी येणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी पर्यवेक्षक व अधिकारी यांची राहण्याची, जेवणाचीआदी व्यवस्था करावी, अशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी एसटी महामंडळाच्या स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.

मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त ४,२४५ विशेष बस सोडल्या होत्या. याद्वारे यात्राकाळामध्ये १८ लाख ३० हजार ९३४ भाविक, प्रवाशांची सुखरूप ने-आण एसटीने केली होती. पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची संख्या लक्षात घेता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना या चार ठिकामी तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आदी विविध सोयी – सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

लोकलचे वेळापत्रक कोलमडले; माटुंगा येथे रेल्वे रुळाला तडा

Next Post

पुढील दोन – तीन तास मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा

Next Post
पुढील दोन – तीन तास मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा

पुढील दोन – तीन तास मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.