Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home कोकण

अनधिकृत बांधकामावर कारवाई न केल्यामुळे मुंबई पालिकेला हायकोर्टानं फटकारलं

मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका, सिडको आणि एमआयडीसीने अनधिकृत बांधकामावर कारवाई न केल्यास न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करा असे बजावण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी नियोजन प्राधिकरणांना ही शेवटची संधी असणार आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 24, 2024
in कोकण, ताज्या बातम्या, नवी मुंबई, महाराष्ट्र, मुंबई
अनधिकृत बांधकामावर कारवाई न केल्यामुळे मुंबई पालिकेला हायकोर्टानं फटकारलं
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईतील अनधिकृत बांधकामावर कारवाई न केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेसह सिडको आणि एमआयडीसीची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. दिलेल्या निर्देशांचं अद्याप पालन अद्याप न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने या बद्दल तीव्र शब्दात नाराची देखील व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात २०१८ साली मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका, सिडको आणि एमआयडीसीला निर्देश दिले होते. आता २०२४ सुरू आहे मात्र अद्याप या निर्देशांचे पालन झालेले नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका, सिडको आणि एमआयडीसीने अनधिकृत बांधकामावर कारवाई न केल्यास न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करा असे बजावण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी नियोजन प्राधिकरणांना ही शेवटची संधी असणार आहे.
अनधिकृत बांधकामांचा निष्कासन करण्यासाठी विशेष पथक स्थापन करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायलयाने २०१५ साली दिले होते. मात्र अद्याप एकही पथक गठीत न झाल्याच समोर आली आहे. ही माहिती मिळताच मुंबई उच्च न्यायालयाने प्राधिकरणांना ताशेरे ओढले आहेत.
आयएएस अधिकाऱ्यांना रस नसून कर्तव्याचे देखील पालन होत नसल्याच उच्च न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नोंदवले आहे. या सगळ्याला जबाबदार कोण? एवढी अनधिकृत कामे कशी काय झाली?, बांधकाम होत असताना प्राधिकरण काय करत होते? अशी प्रश्नाची सरबत्ती उच्च न्यायालयाने केली आहे. कोणी काहीही करायला मोकळा आहे, कशावरही कोणताही प्रतिबंध नाही. या सगळ्याला नवी मुंबई महापालिका जबाबदार आहे. या सगळ्याकडे आम्ही कानाडोळा करू शकत नाही असं मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई आयुक्तांना बजावलं आहे. तसेच नवी मुंबई महापालिका आयुक्तांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Previous Post

पुण्यात चंदन चोरीचा आलेख चढता; तस्करी पुणे व्हाया कर्नाटक

Next Post

जम्मू आणि काश्मीरला लवकरच मिळणार राज्याचा दर्जा; केंद्रात हालचालींना वेग

Next Post
जम्मू आणि काश्मीरला लवकरच मिळणार राज्याचा दर्जा; केंद्रात हालचालींना वेग

जम्मू आणि काश्मीरला लवकरच मिळणार राज्याचा दर्जा; केंद्रात हालचालींना वेग

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.