Lokrakshanay
Saturday, June 27, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home क्रीडा

क्रिकेटचा देव आणि फुटबॉलचा GOAT एका मंचावर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 15, 2025
in क्रीडा, मनोरंजन
क्रिकेटचा देव आणि फुटबॉलचा GOAT एका मंचावर
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : फुटबॉलचा बादशाह लिओनेल मेस्सी हा तब्बल १४ वर्षांनी भारतात आलाय. मेस्सी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून तो कोलकाता, हैद्राबाद, मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये कार्यक्रम घेऊन त्याच्या फॅन्सना भेटणार आहे. मेस्सीचा हा भारत दौरा त्याच्या भारतीय फॅन्ससाठी खूपच खास आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या फुटबॉलरची एक झलक पाहायला मिळावी यासाठी फॅन्स भारतातील विविध शहरांमधून मेस्सी भेट देणाऱ्या शहरांमध्ये पोहोचत आहेत. रविवार १४ डिसेंबर रोजी लिओनेल मेस्सी हा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दाखल झाला. येथे वानखेडे स्टेडियम एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात फॅन्स सह सेलिब्रिटी आणि राजकीय व्यक्ती देखील मेस्सीला भेटण्यासाठी उपस्थित होते.

लिओनेल मेस्सी वानखेडे स्टेडियमवर आला तेव्हा तो फॅन्सला भेटला तसेच त्याने स्टॅन्डच्या दिशेने फुटबॉल सुद्धा भिरकावले. सोबतच तो युवा फुटबॉलपटू असलेल्या संघांसोबत फुटबॉल सुद्धा खेळला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्सीचे मुंबईत स्वागत केले. यावेळी मेस्सीने त्यांना त्याची सही असलेली जर्सी गिफ्ट केली. क्रिकेटचा देव म्हणून प्रसिद्ध असलेला सचिन तेंडुलकरने सुद्धा यावेळी लिओनेल मेस्सीची भेट घेतली. यावेळी सचिन तेंडुलकरने त्यांना आपली १० नंबरची भारताची जर्सी भेट केली. ज्यावर सचिनचा ऑटोग्राफ होता. सचिन आणि मेस्सीने सोबत फोटो काढला. हा भारताच्या क्रीडा विश्वातील एक ऐतिहासिक क्षण होता.

Previous Post

थंडीत रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी घरगुती रामबाण उपाय

Next Post

नोटबंदीच्या ९ वर्षांनंतर दिल्लीत ३.६० कोटींच्या जुन्या नोटा जप्त

Next Post
नोटबंदीच्या ९ वर्षांनंतर दिल्लीत ३.६० कोटींच्या जुन्या नोटा जप्त

नोटबंदीच्या ९ वर्षांनंतर दिल्लीत ३.६० कोटींच्या जुन्या नोटा जप्त

BreakingNews

१ जुलैपासून पासपोर्ट महागणार; १४ वर्षांनंतर शुल्कात मोठी वाढ!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण मोठ्या पडद्यावर; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा!

मलंगगडाचा कायापालट! ३५०० पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी

महिला सुरक्षेसाठी ‘खाकीतील सखी’ उपक्रमाला बळ; ठाणे स्थानकात जनजागृती मोहीम!

खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी ‘सर्वंकष अन्न सुरक्षा अनुपालन आदेश’; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतासमोर आज ‘करा किंवा मरा’चा सामना!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.