Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

शिक्षक, पदवीधरची निवडणूक पुढे ढकलली; केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय भारीतय निवडणूक आयोगाने घेतला आहे. यासंदर्भातील पत्रक आयोगाकडून मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आले.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 14, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
शिक्षक, पदवीधरची निवडणूक पुढे ढकलली; केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : भारतीय निवडणूक आयोगाने ८ मे रोजी राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते. यानुसार विधान परिषदेच्या २ शिक्षक आणि २ पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांसाठी १० जून रोजी मतदान होणार होते तर १३ जून रोजी मतमोजणी होणार होती. आता ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. आयोगाकडून नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. या निवडणुका पुढे ढकलाव्यात यासाठी अनेक शिक्षक संघटनांनी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे. शिक्षक आमदारकीची निवडणूक १० जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्यूटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडले होते. अखेर आनंदाची बातमी आली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर कार्यक्रम तूर्त मागे घेतला आहे. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी आमदार कपिल पाटील यांच्या सोबत दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाकडे मागणी केली होती तर हायकोर्टात याचिकाही केली होती.

या निवडणुकीसाठी १० जून ही तारीख निश्चित करण्यात आल्याने मे महिन्याच्या सुट्टीसाठी बाहेर गेलेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मतदान करता येणे शक्य नव्हते . यामुळे ही निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी शिक्षक भारतीच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका देखील करण्यात आली होती. त्याच बरोबर शिक्षक संघटनांनी आयोगाला निवडणूक पुढे ढकलावी यासाठी निवेदन देखील दिले होते. राज्यात शिक्षण विभागाने २ मे १४ जून अशी सुट्टी जाहीर केली आहे. सर्व शिक्षक आणि कर्मचारी सुट्टीसाठी गावी गेले असल्याने ते ११ जूननंतर परत येतील. राज्यातील शाळा १५ जूननंतर सुरू होणार असल्याने शिक्षक आणि अन्य कर्मचारी मतदानापासून वंचित राहू शकतील असे संघटनेचे म्हणणे होते. तसेच १७ जून ते २० जून पर्यंत बकरी ईद निमित्त उर्दू माध्यमांच्या शाळांना सुट्टी असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षकांचा मताधिकार सुरक्षित केल्याबद्दल सुभाष किसन मोरे यांचे आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होणार आहे. विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ), किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दिनांक ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत.

Previous Post

गौतम नवलखा यांना जामीन मंजूर; भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Next Post

विरोधी पक्षांकडून संविधान बदलले जाणार असल्याचे सांगत समाजाची दिशाभूल; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हल्लाबोल

Next Post
विरोधी पक्षांकडून संविधान बदलले जाणार असल्याचे सांगत समाजाची दिशाभूल; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हल्लाबोल

विरोधी पक्षांकडून संविधान बदलले जाणार असल्याचे सांगत समाजाची दिशाभूल; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हल्लाबोल

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.