Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

साहाय्यक आयुक्तांवर कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे तोडण्याची जबाबदारी

बेकायदा बांधकामांविषयीचे शासन आदेश, न्यायालयीन संपर्क या कामासाठी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 8, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
साहाय्यक आयुक्तांवर कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे तोडण्याची जबाबदारी
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील प्रभागस्तरावरील बेकायदा बांधकामे तोडण्याची जबाबदारी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी प्रभागातील साहाय्यक आयुक्तांंवर शासन निर्णयाप्रमाणे सोपवली आहे. बेकायदा बांधकामांविषयीचे शासन आदेश, न्यायालयीन संपर्क या कामासाठी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी आणि नागरिकांना घर बसल्या तक्रारी करता याव्या म्हणून आयुक्त डाॅ. जाखड यांच्या आदेशावरून १८००२३३४३९२ हा सुविधा क्रमांक सुरू करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांंनी ठाणे पालिका हद्दीतील बेकायदा इमारती तोडण्यासाठी विशेष कार्यक्रम घोषित केल्यानंतर कल्याण डोंबिवली पालिकेनेही अशाच प्रकारचा निर्णय घेतल्याने भूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत मागील २५ वर्षाच्या कालावधीत एक लाख ६७ हजार बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. याशिवाय मागील तीन वर्षाच्या काळात टोलेजंग ६५ बेकायदा इमारती उभारून भूमाफियांनी या इमारतींना महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून या बेकायदा इमारतीमधील सदनिका नागरिकांना विकल्या आहेत. या बेकायदा बांधकाम प्रकरणी हरिश्चंद्र म्हात्रे, वास्तुविशारद संदीप पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत.

शहराचे नियोजन बिघडवणारी एवढी बेकायदा बांधकामे कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्यांंनी कशी होऊन दिली. तेथील प्रशासकीय यंत्रणा काय करत होती, असे प्रश्न करून महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून उभारलेल्या डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश मुख्य न्यायमूर्ती देंवेद्र उपाध्याय, न्यायमूर्ती आरिफ डाॅक्टर यांंनी दिले आहेत. या कारवाईचा अहवाल प्रतिज्ञापत्रासह देण्यासाठी पालिका आयुक्तांना २४ जानेवारी रोजी स्वता उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या सगळ्या प्रकरणावरून आयुक्त डाॅ. जाखड यांंनी नगररचना विभाग, अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांना जाब विचारून तातडीने बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम १९४९ मधील कलमानुसार २६०, २६७, ४७८, १९६६ मधील तरतुदी मधील कलम ५२, ५३, ५४ नुसार बेकायदा बांधकामांवर कारवाईचे अधिकार प्रभाग अधिकारी (साहाय्यक आयुक्त) यांना आहेत. तीन वर्षापूर्वी शासन सेवेतून पालिकेत आलेल्या अधिकाऱ्यांनी आपल्यावरील बालट टाळण्यासाठी तत्कालीन आयुक्तांशी चर्चा करून ही जबाबदारी प्रभागातील अधीक्षकांवर सोपवली होती. कायद्याने अधिकार नसल्याने अधीक्षक बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी पुढाकार घेत नव्हते. यामुळे शहरात बेकायदा बांधकामे मागील दोन वर्षात वाढली, अशा तक्रारी आहेत. आयुक्त इंदुराणी जाखड यांनी ही चूक सुधारून बेकायदा बांधकामे तोडण्याची जबाबदारी पुन्हा प्रभाग अधिकारी तथा साहाय्यक आयुक्तांवर सोपवली आहे. यामुळे साहाय्यक आयुक्त आता स्वताहून बेकायदा बांधकामे तोडतात की पोलीस बंदोबस्त मिळत नाही म्हणून टाळाटाळ करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. घर खरेदीत नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी आणि बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी प्रभाग अधिकारी पदनिर्देशित अधिकारी आहेत. बेकायदा बांधकामांच्या तक्रारीसाठी सुविधा क्रमांक सुरू करण्यात आला आहे.

Previous Post

हरमनप्रीत कौरने ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामन्यातील पराभवाचं खापर फोडलं फलंदाजांवर

Next Post

नागपाडा पोलीस ठाण्यात वायरल पत्रप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक

नागपाडा पोलीस ठाण्यात वायरल पत्रप्रकरणी गुन्हा दाखल

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.