Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home क्रीडा

हरमनप्रीत कौरने ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामन्यातील पराभवाचं खापर फोडलं फलंदाजांवर

फलंदाजांना साजेशी खेळी करण्यात अपयश आल्यानं मालिका जिंकण्याची संधी हुकल्याच तीन म्हंटल आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 8, 2024
in क्रीडा, नवी मुंबई
हरमनप्रीत कौरने ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामन्यातील पराभवाचं खापर फोडलं फलंदाजांवर
Share on FacebookShare on Whatsapp

INDW vs AUSW T20 Series | तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवून यजमान भारताने विजयी सलामी दिली होती. पण, दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांना साजेशी खेळी करण्यात अपयश आलं. दीप्ती शर्मा (३०) वगळता एकाही फलंदाजाला सन्मानजनक धावा करता आल्या नाहीत. भारतीय महिला संघ मायदेशात ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर ही मालिका खेळवली जात आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत ८ बाद १३० धावा केल्या. या सोप्या आव्हानाचा कांगारूंनी सहज पाठलाग केला आणि मालिकेत बरोबरी साधली. पाहुण्या ऑस्ट्रेलियानं १९ षटकांत ४ विकेट गमावून लक्ष्य गाठलं. पराभवानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं संघाच्या चुकांबद्दल भाष्य केलं आहे.

हरमननं पराभवाचं खापर भारतीय फलंदाजांवर फोडलं. प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारण्याची गरज होती. मात्र, फलंदाजांना साजेशी खेळी करण्यात अपयश आल्यानं मालिका जिंकण्याची संधी हुकली. “मला वाटतं की, आम्ही अपेक्षित धावसंख्या उभारली नाही. मात्र, गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आम्ही सामना १९व्या षटकापर्यंत खेचला, जी एक चांगली बाब आहे. पहिल्या सामन्यात आमचं एकतर्फी वर्चस्व होतं. या सामन्यांमध्ये आमच्या क्षेत्ररक्षणात सुधारणा केली आहे”, असं हरमनप्रीत कौरनं नमूद केलं. खरं तर हरमननं पराभवाचं खापर श्रेयांका पाटीलवर फोडताच नेटकऱ्यांनी तिच्यावर सडकून टीका केली.

ऑस्ट्रेलियानं सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली होती का? असं विचारलं असता हरमननं सांगितलं, “आम्हाला ती संधी तयार करायची होती… १९व्या षटकात श्रेयांका पाटीलनं चांगला चेंडू टाकला असता तर फरक पडला असता. कारण फुल टॉस चेंडूवर एलिसे पेरीनं चौकार मारला. आम्ही या आधी देखील अशा सामन्यांचे साक्षीदार राहिलो आहोत. मात्र प्रत्येकवेळी संघातील सहकारी बदलत असतात. हा युवा वर्ग सकारात्मक असून अनुभव येताच सुधारणा होत जाईल.”

 

Previous Post

कल्याण गुन्हे शाखेची कारवाई; डोंबिवलीत कोयता घेऊन फिरणाऱ्या तडीपार गुंडाला अटक

Next Post

साहाय्यक आयुक्तांवर कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे तोडण्याची जबाबदारी

Next Post
साहाय्यक आयुक्तांवर कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे तोडण्याची जबाबदारी

साहाय्यक आयुक्तांवर कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे तोडण्याची जबाबदारी

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.