Lokrakshanay
Thursday, January 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाणे महापालिकेच्या सर्वेक्षणात माहिती उघड, १२४७ दुकाने ठाण्यात मराठी पाटीविना

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे शहरातील दुकानांच्या पाट्या मराठीत आहेत की नाही, याचे सर्वेक्षण महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 16, 2023
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाणे महापालिकेच्या सर्वेक्षणात माहिती उघड, १२४७ दुकाने ठाण्यात मराठी पाटीविना
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे शहरातील दुकानांच्या पाट्या मराठीत आहेत की नाही, याचे सर्वेक्षण महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. गेल्या सहा दिवसांत पालिकेच्या पथकाला १ हजार २४७ दुकानांच्या पाट्या मराठी नसल्याचे आढळून आले असून यात सर्वाधिक दुकाने वागळे इस्टेट, कोपरी-नौपाडा आणि उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील आहेत. या दुकांना पालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याने दुकानांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

दुकाने व विविध आस्थापनांचे नामफलक मराठीत ठळक अक्षरात लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबत उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या अधिसूचननेनुसार महापालिका, नगरपंचायत व नगरपरिषदेला कारवाई अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मराठी पाट्या नसलेल्या दुकाने आणि विविध आस्थापनांना नोटीसा बजावण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईसाठी त्यांनी शहरातील नऊ प्रभागसमितीच्या सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी निश्चित केली असून सहाय्यक आयुक्तांनी पथके तयार करून शहरात दुकानांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यात दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत आहेत की नाही याची खातरजमा करण्यात येत आहे. प्रत्येक आस्थापनेचा नामफलकावरील अक्षर मराठी भाषेत आहेत का, मराठी भाषेतील अक्षरांचा टंक हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान आहे का, याची तपासणी पथकाकडून केली जात आहे. यामध्ये गेल्या सहा दिवसांत पालिकेच्या पथकाला १ हजार २४७ दुकानांच्या पाट्या मराठी नसल्याचे आढळून आल्या असून या दुकानांना पालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. या दुकानांना ३० डिसेंबरपर्यंत मराठी भाषेत पाट्या बसविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या मुदतीनंतरही पाट्या मराठीत झाल्यानंतर कामगार विभागाला तसा अहवाल पाठविण्यात येईल. कारण कारवाईचे अधिकार या विभागाला आहेत, अशी माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

मराठीत पाट्या नसलेल्या दुकानांची आकडेवारी

प्रभाग समिती – मराठीत पाट्या नसलेल्या दुकानांची संख्या

कोपरी-नौपाडा – २०६

माजिवाडा-मानपाडा – ७४

लोकमान्य-सावरकरनगर – १२८

उथळसर – २१०

वर्तकनगर – ५४

कळवा – ६७

मुंब्रा – १३७

दिवा – १५४

वागळे इस्टेट – १९७

एकूण – १२२७

Previous Post

२८ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ वर्षभरात जप्त

Next Post

एसटी आगाराकडून सोयीसाठी ज्यादा फेर्‍या; रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल

Next Post
एसटी आगाराकडून सोयीसाठी ज्यादा फेर्‍या; रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल

एसटी आगाराकडून सोयीसाठी ज्यादा फेर्‍या; रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल

BreakingNews

राज्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार ड्रोन कॅमेऱ्याची नजर!

उल्हासनगरमध्ये खळबळ : ५० लाखांची रोकड जप्त!

मताधिकार मोबाईल ॲप : मतदारांना घरबसल्या शोधता येणार यादीतील नाव आणि मतदान केंद्र!

आता एका सिगारेटसाठी मोजावे लागणार ७२ रुपये?

कल्याण हादरले! २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अमेरिकेला भारतीय कोळंबीची चटक! शुल्कात वाढ केल्यानंतरही निर्यातीत वाढ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.