मुंबई : मुंबई लोकलमधील प्रवास म्हणजे दररोजची धावपळ, गर्दी आणि वेळेशी चाललेली स्पर्धा. या गर्दीत अनेक महिला आत्मविश्वासाने प्रवास करतात. मात्र, कधी कधी असुरक्षिततेची भावना डोकावते. अशा वेळी मदतीसाठी आता दूर कुठे शोध घ्यावा लागणार नाही. कारण लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांच्या हातातच आता ‘पॅनिक बटण’ असणार आहे. याबाबतचे सादरीकरण मध्य रेल्वेच्या नव्या महाव्यवस्थापकांसमोर सादर केले जाईल आणि त्यानंतरच ही नवी सुविधा महिलांच्या हातात देण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने महिला सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी ‘यात्री’ मोबाईल अॅपमध्ये ‘एसओएस’ फौचर उपलब्ध करून देण्याची तयारी अंतिम टप्यात आणली आहे. या सुविधेमुळे प्रवासादरम्यान कोणतीही अडचण किया धोव्याची परिस्थिती निर्माण झाल्यास महिलेला मोबाईलमधील पैनिक बटण दाबताच मदतीचा संदेश बेट रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) कंट्रोल रूमपर्यंत पोहोचेल, त्यानतर नियंत्रण कक्षातून संबधित गाडीची माहिती घेत पुढील स्थानकावर आरपीएफचे कर्मचारी तातडीने सज्ज केले जाणार आहेत, मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर दररोज लाखो महिला प्रवास करतात, गर्दीच्या वेळी छेडछाड, वाद किंवा इतर अडचणी निर्माण झाल्यास तातडीने मदत मिळणे अनेकदा कठीण होते. याच पाश्र्वभूमीवर मध्य रेल्वेने यात्री अॅपमध्ये ही नदी सुविधा विकसित केली आहे. महिला प्रवाशाने पैनिक बटण दाबताच संबंधित गाती आणि डब्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळेल,
यापूर्वी लोकलच्या काही डब्यांमध्ये तसेच प्लैटफॉर्मवर पैनिक बटणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र आता ही सुविधा बेट प्रवाशाच्या मोबाईलमध्ये येत असल्याने महिलाना मदत मागणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान असुरक्षित वाटल्यास एका क्लिकवर रेल्वे सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधता येणार आहे, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘यात्री मोबाईलअॅपमधील एसओएस फीचरचे तांत्रिक काम अंतिम टप्यात असून लवकरच ही सुविधा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे. 66 महिला सुरक्षेसाठी मोबाईल अॅपमध्ये पैनिक बटण देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र प्रत्येक महिलेला स्मार्ट मोबाईलचा वापर सहज करता येतोच असे नाही. त्यामुळे महिला डब्यामध्येही पनिक बटणांची संख्या वाढवणे गरजेचे आहे, तसेच डब्यांमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर लावलेली पैनिक बटणे व हेल्पलाइन क्रमांक याना रेल्वेकडून तातडीने प्रतिसाद मिळणेही तितकेच महत्वाचे आहे. 6- आत्तापर्यंत प्लॅटफॉर्मवर किया डब्यात पैनिक बटण असल्याचे ऐकले होते, पण ते शोधणे नेहमी सोपे नसते. आता मोबाईलमध्येच ही सुविधा मिळाल्यास एका क्लिकवर मदत मिळू शकते. महिला सुरक्षेसाठी हा खूप चांगला निर्णय आहे.महिला सुरक्षेसाठी मोबाईलमध्ये पैनिक बटणाची सुविधा देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. लोकलने दररोज प्रवास करणाऱ्या महिलांना गरज भासल्यास एका क्लिकवर मदत मागता येणार आहे, या सुविधेमुळे महिलांना प्रवासादरम्यान अधिक सुरक्षित वाटेल, असे मत महिला प्रवाशानी व्यक्त केले आहे. यापूर्वी काही लोकल डब्यांमध्ये पॅनिक बटण बसविण्यात आले होते. तसेच अनेक रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवरही ही सुविधा उपलब्ध होती. मात्र आता पहिल्यांदाच पैनिक बटणाची सुविधा वेट प्रवाशांच्या मोबाईलमध्ये येणार आहे.
पॅनिक बटण’ कसे काम करेल ?
- ‘यात्री’ मोबाईल अॅपमध्ये एसओएस पॅनिक बटण उपलब्ध
- बटण दाबताच संदेश आरपीएफ कंट्रोल रूमला पाठवला जाणार
- संबंधित गाडीची माहिती कंट्रोलला मिळणार
- पुढील स्थानकावर आरपीएफ कर्मचारी सज्ज ठेवले जाणार
- गाडी येताच संबंधित डब्यात तातडीने मदत मिळेल

