नवरा माझा नवसाचा २ | मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर लवकरच ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या दोघेही व्यस्त आहे. मात्र यादरम्यान दोघांचाही रोमॅंटिक अंदाजामधील एक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये या कपलचा “जहां मैं जाती हूँ वहीं चले आते हो” या गाण्यावरील रोमॅटिंक अंदाज सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याची क्रेझ आजही कायम आहे. याच गाण्यावर सचिन आणि सुप्रिया या जोडीचा रोमॅंटिक अंदाज चाहत्यांच्या देखील पसंतीस पडला आहे.