Lokrakshanay
Friday, May 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

शिक्षकांच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या

चिठ्ठीत त्याने शाळेतील त्याच्या एका शिक्षिकेकडून त्रासाची माहिती देऊन त्याला कंटाळून ही आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 12, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
शिक्षकांच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : कल्याण पूर्वेतील आयडियल शाळेतील एका १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. शाळेतील एका शिक्षेककडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. विघ्नेश पात्रो (१२) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आयडियल शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. आत्महत्या करण्यापूर्वी विघ्नेशने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत त्याने शाळेतील त्याच्या एका शिक्षिकेकडून त्रासाची माहिती देऊन त्याला कंटाळून ही आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

कोळसेवाडी पोलिसांनी या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला. एका राजकीय व्यक्तिशी संबंधित ही शिक्षण संस्था आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला आहे. काही दिवसापूर्वी कल्याण जवळील वरप येथे सेक्रेड हार्ट शाळेतील अनीश दळवी या विद्यार्थ्याने शाळा चालकांच्या मनमानीला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणात शाळेचे संचालक आल्विन ॲन्थोनी यांना टिटवाळा पोलिसांनी अटक केली होती. अलीकडे शिक्षकांच्या त्रासामुळे विद्यार्थी आत्महत्या करू लागल्याने पालक वर्गाने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. काही विशिष्ट शाळांमध्ये हा प्रकार अधिक असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.

Previous Post

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाहनावर हल्ला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल आपले मत व्यक्त केले

Next Post

प्रियकराकडून प्रेयसीचा विश्वासघात, बळजबरीने केला बलात्कार : गुन्हा दाखल

Next Post
प्रियकराकडून प्रेयसीचा विश्वासघात, बळजबरीने केला बलात्कार : गुन्हा दाखल

प्रियकराकडून प्रेयसीचा विश्वासघात, बळजबरीने केला बलात्कार : गुन्हा दाखल

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.