Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

प्रियकराकडून प्रेयसीचा विश्वासघात, बळजबरीने केला बलात्कार : गुन्हा दाखल

लैंगिक छळ या गुन्ह्यांच्या आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 12, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
प्रियकराकडून प्रेयसीचा विश्वासघात, बळजबरीने केला बलात्कार : गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई पोलिसांनी नागपाडा भागातल्या २१ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. सोहेल खान असं या तरुणाचं नाव आहे. बलात्कार, शोषण, लैंगिक छळ या गुन्ह्यांच्या आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली आहे. सोहेल खानने त्याच्याच प्रेयसीला घरी सोडतो असं सांगितलं, तिला हॉटेलवर नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीप्रमाणे, सोहेल खान या तरुणाने त्याच्या प्रेयसीला कॉलेजमध्ये गाठलं. त्यानंतर तिला सांगितलं की मी तुला घरी सोडतो. मात्र तिला घरी सोडण्याऐवजी तो त्याच्या प्रेयसीला भायखळा येथील हॉटेलवर घेऊन गेला. तिथे त्याने तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवले. या तरुणीनेच त्याच्यावर हा आरोप केला आहे की तिच्या प्रियकराने तिच्या इच्छेविरोधात तिच्याशी शरीर संबंध ठेवले. तरुणीच्या तक्रारीनंतर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या मुलीने असंही सांगितलं आहे की आम्ही प्रियकर प्रेयसी आहोत, आमच्या नात्याबद्दल घरातल्या लोकांनाही माहीत आहे. त्यांनी आमच्या लग्नालाही होकार दिला आहे. मला सोहेलने हॉटेलवर नेलं आणि बळजबरी करु लागला. शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी त्याने माझ्यावर दबाव टाकला. माझ्या आई वडिलांनी त्याला हे सांगितलं होतं की तो आजारातून बरा झाल्यावर त्याच्याशी माझं लग्न लावून देतील. तरीही त्याने हे कृत्य केलं.

महाविद्यालयीन तरुणी आणि सोहेल खान यांचं लग्न होणार होतं. मात्र या तरुणीने पोलिसात प्रियकर सोहेल खान विरोधात तक्रार दाखल केली आहे. कॉलेजमधून घरी सोडतो असं सांगत त्याने हॉटेलवर नेलं आणि बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. मी नकार दिला तरीही त्याने ऐकलं नाही असं या तरुणीने सांगितलं आहे. आरोपीच्या प्रेयसीनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत बलात्कार, विनयभंग आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रेयसीच्या तक्रारीनुसार, सोहेल खानने मुलीला तू माझं ऐकलं नाहीस तर तुला कॉलेजमधून काढून टाकायला सांगेन असं तिला सांगितलं. त्यानंतर घरी सोडतो म्हणाला आणि तिला भायखळ्यातील एका हॉटेलमध्ये नेलं. त्यानंतर तिची इच्छा नसताना, ती नकार देत असताना तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. असं या तरुणीनेच पोलिसांना सांगितलं आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सोहेल खानला बलात्कार, विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे.

Previous Post

शिक्षकांच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या

Next Post

डोंबिवली : लोकल ट्रेनमधून प्रवासी पडून जखमी

Next Post
डोंबिवली : लोकल ट्रेनमधून प्रवासी पडून जखमी

डोंबिवली : लोकल ट्रेनमधून प्रवासी पडून जखमी

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.