Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

दसरा, दिवाळीत विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी रेल्वेने आखली विशेष तिकीट तपासणी मोहीम

ही मोहिम १ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 30, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
दसरा, दिवाळीत विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी रेल्वेने आखली विशेष तिकीट तपासणी मोहीम
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : सध्या विनातिकीट किंवा अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही गैरसोय होते. सुट्टीच्या दिवशी रेल्वेगाडी, रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीस नसतात, असा गैरसमज बाळगून सर्रास विनातिकीट प्रवास केला जातो. त्यामुळे दसरा, दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. ही मोहिम १ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. विशेष तिकीट तपासणी मोहीम १ ते १५ ऑक्टोबर आणि २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत राबवली जाणार आहे. यादरम्यान रेल्वेगाडीच्या आरक्षित, अनारक्षित डब्यांमध्ये किंवा स्थानकांवर अवैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जाईल. मोहिमेदरम्यान ज्येष्ठ नागरिक, कर्करोग रुग्ण व इतर विशिष्ट कोट्यातून आरक्षण मिळालेल्या प्रवाशांच्या तिकिट तपासणीवर विशेष भर दिला जाणार आहे. जेणेकरून विशिष्ट कोट्याचा गैरवापर रोखता येईल. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास सोयीचा होईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

धावत्या आणि गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये तिकीट तपासनीस येत नसल्याने गर्दीच्या आडून प्रवासी विनातिकिट प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेच्या महसुलावर परिणाम होतो. तसेच तिकीटधारक प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. याबाबत प्रवाशांकडून रेल्वेकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर गर्दी असलेल्या लोकलमध्येही तिकीट तपासनीसांचे पथक तपासणी करणार आहे. वातानुकूलित लोकल आणि सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात विनातिकीट प्रवाशांचा प्रवास वाढल्याने, तिकीट धारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत आहे. तिकीट तपासणी करूनही विनातिकीट प्रवाशांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे वातानुकूलित आणि प्रथम श्रेणी डब्यातील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेने एसी टास्क फोर्स सुरू करून, प्रवाशांना तक्रार करण्यासाठी ७२०८८१९९८७ हा व्हॉट्सॲप क्रमांक दिला आहे. शिवाय वातानुकूलित लोकल अथवा प्रथम श्रेणी डब्यांतील समस्या सोडविण्यासाठी एक विशेष पथकही तयार केले आहे.

Previous Post

‘पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला..’; विद्यार्थ्यांचे गणवेश पाहून विरोधक संतापले

Next Post

“विकासासाठी महाराष्ट्रात नवा चेहरा देणार”, शरद पवारांनी दिले राजकीय संकेत

Next Post
“विकासासाठी महाराष्ट्रात नवा चेहरा देणार”, शरद पवारांनी दिले राजकीय संकेत

"विकासासाठी महाराष्ट्रात नवा चेहरा देणार", शरद पवारांनी दिले राजकीय संकेत

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.