पुणे : महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. यासाठी रोहितला चिंता करण्याची गरज नाही. दोन महिन्यांनी महाराष्ट्राच चित्र बदलेल. दोन दिवसापूर्वी मी साताऱ्याला होतो, त्यानंतर मी कराड चिपळूण या ठिकाणी होतो, त्यानंतरच्या काळात मुंबईला आलो, मुंबईवरून इच्छा आलो. दोन अडीच दिवसात मी एवढा प्रवास केला. एवढा प्रवास कशासाठी ठिकठिकाणी विकासासंबंधी नवा चेहरा लोकांना विश्वासात घेऊन कसा करता येईल याचा विचार आम्ही लोक बसून करतोय. असे शरद पवार यांनी सांगितले आहे. जामखेड येथील खर्डा किल्ल्याच्या नुतनीकरण कामाचे भुमिपूजन व यशवंत होळकर यांच्यावरील पुस्तक प्रकाशन कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, जे लोक सत्तेत होते, विधिमंडळात होते. आज सत्ता असेल अथवा नसेल पण ज्या भागातील जनतेने सत्ता दिली त्यांच्यासाठी काही होत असेल तर त्याला मदत करणं हे तर कर्तव्य आहे पण मदत करणे शक्य नसेल तर त्यात अडथळा आणू नका. या तालुक्यामध्ये काही नवीन होत आहे असं म्हटल्यावर त्यात अडथळा आणायचा आहे. त्याला स्थगिती आणायची आहे. उभ करण्यासाठी अक्कल लागते, उभ केलेलं उध्वस्त करायला अक्कल लागत नाही. हे लोकांना आता पटलेल आहे. उभा करण्याची ताकद आणि धमक ज्याच्यामध्ये आहे त्याच्या पाठीमागे उभे राहायचा निकाल तुम्ही लोकांनी घेतला ते चित्र आज या ठिकाणी दिसतय याचा मला मनापासून आनंद आहे.
कर्तृत्व दाखवण्याची संधी आली त्यावेळी जे कर्तृत्व दाखवतात तेच समाजकारण आणि राजकारणात टिकतात ही माझी खात्री आहे. मी पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा मतदार संघात प्रश्न होते त्यात लक्ष घातलं. पाण्याचा प्रश्न, शैक्षणिक चळवळ, उद्योगधंदे यात लक्ष घातलं. त्याचा परिणाम आज देशामध्ये, संसदेमध्ये बोललं जातं की विकास करायचा असेल तर बारामती पॅटर्न हा विकासाचा पॅटर्न झाला. माझी खात्री आहे की आणखी पाच वर्षानंतर लोक म्हणतील प्रचंड संकटाच्या काळात सुद्धा अडचणी आणि अडथळे असलेला मतदारसंघ याच्यावर मात करून यशस्वी करण्याचा पॅटर्न कोणता? तर कर्जत जामखेडचा पॅटर्न हा विचार संपूर्ण महाराष्ट्रात गेल्याशिवाय राहणार नाही. हे काम करण्यासाठी आज हा तरुण प्रयत्नांची पराकाष्टा करतोय. असेही त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.