Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

सराफ व्यापाऱ्याला लुटल्याप्रकरणी दादर पूर्व येथे सहा जणांना अटक

दादर पूर्व येथे सराफ कंपनीच्या व्यवस्थापकाला सहा जणांनी मारहाण करून त्याच्याकडील २७ लाखांचा मुद्देमाल लुटला होता.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 29, 2023
in ताज्या बातम्या, मुंबई
नवी मुंबईत आरोपीला चरस विक्री प्रकरणी अटक
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : दादर पूर्व येथे सराफ कंपनीच्या व्यवस्थापकाला सहा जणांनी मारहाण करून त्याच्याकडील २७ लाखांचा मुद्देमाल लुटला होता. त्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. लोअर परळ परिसरातील सन मिल कंपाऊंडमध्ये वास्तव्यास असलेले बलरामकुमार पोलेंद्र सिंह (२६) व्यवस्थापक म्हणून बी.एम. ज्वेलर्स कंपनीत काम करतात. सिंह सहकारी सोमेन सैकती व तौफिक मुल्ला यांच्यासोबत १७ डिसेंबरला दादर रेल्वेस्थानक येथून लोअर परळ परिसरात जात होते. त्यावेळी रामी हॉटेलजवळ सहा व्यक्तींनी त्यांची टॅक्सी अडवली व त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांच्याकडील लाल रंगाच्या बॅगेमधील ३५ किलो कास्टींग गोल्ड व गोल्ड फायलिंग (६५० ग्रॅम) असा सुमारे २७ लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपींनी हिसकावून घेतला. त्यानंतर आरोपींनी तेथून पलायन केले.

याबाबतची माहिती सिंहने कंपनीच्या मालकांना दिल्यानंतर स्थानिक माटुंगा पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. सिंह याच्या तक्रारीवरून माटुंगा पोलिसांनी दरोडा व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक चव्हाण यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ याप्रकरणी तपास पथकाची स्थापना केली. पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष माळी, विनोद पाटील, सुनील चव्हाण, पोलीस हवालदार राहूल राजभर, नथुराम चव्हाण यांनी सीसीटीव्हीच्या मदतीन तपासाला करून तपासाला सुरूवात केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी याप्रकरणी आकाश चव्हाण(३०), आतिश मिसाळ(२१), विजय मोरे(३४), सतेंद्र पांडे(२५), पारूल श्रीवास्तव( २८) व अनुज शर्मा(३६) यांना अटक केली आहे. याप्रकरणी आकाश, आतिश व विजय मोरे यांना प्रथम पोलिसांनी अटक केली.त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर संतेंद्र, पारूल व अनुज यांना पुढे अटक झाली. आरोपींकडून दोन लाख रोख, १२७ ग्रॅम सोने व सहा किलो कास्टींग गोल्ड जप्त करण्यात आले आहे.

Previous Post

प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

साडे पाच हजार पोलिसांचा नववर्ष स्वागतानिमित्ताने बंदोबस्त

Next Post
साडे पाच हजार पोलिसांचा नववर्ष स्वागतानिमित्ताने बंदोबस्त

साडे पाच हजार पोलिसांचा नववर्ष स्वागतानिमित्ताने बंदोबस्त

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.