Lokrakshanay
Sunday, April 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाण्यात ‘शिवशंभू गाथा’ कार्यक्रमाचे आयोजन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 17, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाण्यात ‘शिवशंभू गाथा’ कार्यक्रमाचे आयोजन
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शिवशंभू गाथा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवरायांचा आणि शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास उलगडला जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हा भव्य कार्यक्रम बुधवार, दि.१८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत ‘राम गणेश गडकरी रंगायतन’, ठाणे येथे पार पडणार आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत कलाकार आपल्या कलेतून इतिहास जिवंत करणार आहेत. यामध्ये ‘कलर्स मराठी गौरव महाराष्ट्राचा’ महाविजेता वैभव थोरात, ‘सोनी टीव्ही मराठी इंडियन आयडॉल’ विजेता सागर म्हात्रे आणि रोहित पाटील यांसारखे दिग्गज गायक आपली कला सादर करतील. तसेच सुप्रसिद्ध गायिका मैथिली भगत, पूजा म्हात्रे आणि कथावाचक कल्पेश डुकले यांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना स्वराज्याचा पराक्रम जवळून अनुभवता येईल. ऐतिहासिक गाणी, पोवाडे, कथावाचन आणि नृत्याविष्काराने सजलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची आणि अभिमानाची मोठी पर्वणी ठरणार आहे. याशिवाय, १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथेही शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन पिढीला आपल्या वैभवशाली संस्कृतीची आणि इतिहासाची ओळख व्हावी, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रूपाली भालके आणि तहसिलदार सचिन चौधर, संदीप थोरात यांनी केले आहे.

Previous Post

मुलुंड मेट्रो दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई! एक्झिक्युटिव्ह इंजिनियर निलंबित

Next Post

आता एसटीच्या सुरक्षेला मिळणार डिजिटल कवच! प्रवाशांना‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून अभेद्य संरक्षण

Next Post
आता एसटीच्या सुरक्षेला मिळणार डिजिटल कवच! प्रवाशांना‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून अभेद्य संरक्षण

आता एसटीच्या सुरक्षेला मिळणार डिजिटल कवच! प्रवाशांना‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्पा’तून अभेद्य संरक्षण

BreakingNews

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.