Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

खाडी परिसरात हातभट्टी विरोधात महसूल विभागाची कारवाई; ३३ हजार ६०० लिटर रसायन नष्ट

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 21, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
खाडी परिसरात हातभट्टी विरोधात महसूल विभागाची कारवाई; ३३ हजार ६०० लिटर रसायन नष्ट
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : जिल्ह्यातील अंजूरगाव आणि आलीमघर खाडी परिसरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बळावलेल्या अवैध हातभट्टी मद्यनिर्मितीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जोरदार धडक कारवाई केली. बोटींच्या मदतीने खाडीत राबवलेल्या या विशेष मोहिमेत एकूण ९ लाख १६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत संबंधितांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मुसळधार पाऊसामुळे अवैध पद्धतीने रेती उपसा करणाऱ्यांना ज्या पद्धतीने पेव फुटते त्याच पद्धतीने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध पद्धतीने गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या विरोधात कारवाई सत्र सुरू आहे. मागील आठवड्यात अंबरनाथ तालुक्यात येथेही हातभट्टीवर कारवाई करण्यात आली होती. याच पद्धतीने अंजूरगाव आणि आलीमघर खाडीत पावसाळ्याचा फायदा घेत खाडी भागात काही लोकांकडून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू तयार केली जात होती.

या बेकायदेशीर धंद्याला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पावसाचे आव्हान स्वीकारत मुसळधार पावसात थेट खाडीत बोटीने प्रवेश करून ही कारवाई केली. या मोहिमेत २०० लिटर क्षमतेचे तब्बल १७८ ड्रम, १००० लिटर क्षमतेचे ३ बॉयलर, अंदाजे ३३ हजार ६०० लिटर रसायन, ३५ लिटर गावठी दारू आणि इतर हातभट्टीचे साहित्य जप्त करण्यात आले. यातील काही नाशवंत वस्तू घटनास्थळीच नष्ट करण्यात आल्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठाणे जिल्ह्यासह कोकण विभागात अशा अवैध दारू निर्मितीविरोधात सातत्याने मोहिमा राबवण्यात येत आहेत. विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती देण्यासाठी १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेंद्र देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोकण विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांच्या आदेशानुसार पार पडली.

Previous Post

गणेशोत्सवात पोलीस प्रशासनाकडून कोणतेही एकतर्फी निर्बंध नाहीत, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आश्वासन

Next Post

सेवेचे समाधान आणि आशीर्वादाची संपत्ती!

Next Post
सेवेचे समाधान आणि आशीर्वादाची संपत्ती!

सेवेचे समाधान आणि आशीर्वादाची संपत्ती!

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.