Lokrakshanay
Thursday, July 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

रबाळेतील हत्या प्रकरणाचा ११ महिन्यांनी छडा; पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केला पतीचा गेम

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 15, 2026
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या, नवी मुंबई
रबाळेतील हत्या प्रकरणाचा ११ महिन्यांनी छडा; पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केला पतीचा गेम
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी परिसरात अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हा खून तब्बल ११ महिने लपवून ठेवण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या तांत्रिक आणि सखोल तपासामुळे या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला असून, पत्नी सुनीता कुशवा (वय ४०) आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती (वय ३०) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पोलीस उपआयुक्त विजय खरात यांनी दिली. मृत बळीराम सूर्यनाथ कुशवा (वय ५०) हे पत्नी आणि दोन मुलांसह यादव नगर, रबाळे एमआयडीसी परिसरात राहत होते. ऑगस्ट २०२५ पासून बळीराम बेपत्ता असतानाही पत्नीने आठ महिने पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली नव्हती. चौकशीदरम्यान तिच्या जबाबामध्ये वारंवार विसंगती आढळून आली. तसेच ती वारंवार राहण्याचा पत्ता बदलत असल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत तिच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि इतर पुरावे तपासले असता राहुल प्रजापती या घणसोली येथे राहणाऱ्या रिक्षाचालकाशी तिचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. तपासादरम्यान आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री बळीराम झोपेत असताना दोघांनी मिळून त्याची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे तुकडे करून ते चादरीत गुंडाळून गोणीत भरले आणि निर्जनस्थळी टाकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

खून केल्यानंतर अनेक महिने हा प्रकार लपविण्यात आला. पत्नी सुनीता ही पती कौटुंबिक वादानंतर घर सोडून गेल्याचे नातेवाईकांना आणि परिसरातील लोकांना सांगत होती. मात्र, बळीरामचा भाऊ मूळ गावाहून नवी मुंबईत आल्यानंतर त्याला या स्पष्टीकरणावर संशय आला. इतर नातेवाईकांनाही बळीरामचा कोणताही संपर्क होत नसल्याने शंका निर्माण झाली. अखेर एप्रिल २०२६ मध्ये कुटुंबीयांनी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बळीराम बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी विविध तांत्रिक पुरावे, मोबाईल रेकॉर्ड आणि आरोपींची चौकशी यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. तपासात समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे १० जुलै २०२६ रोजी सुनीता कुशवा आणि राहुल प्रजापती यांच्याविरुद्ध हत्या व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून दोघांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक कल्पना जाधव करत असून, गुन्ह्याशी संबंधित आणखी पुरावे आणि माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस उपआयुक्त विजय खरात यांनी सांगितले.

 

Previous Post

राज्यातील १९ महाविद्यालयांमध्ये १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प; कामांना गती देण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

Next Post

एसटी प्रवास महागण्याची शक्यता; १३.५० टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावावर आज होणार निर्णय

Next Post
एसटी प्रवास महागण्याची शक्यता; १३.५० टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावावर आज होणार निर्णय

एसटी प्रवास महागण्याची शक्यता; १३.५० टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावावर आज होणार निर्णय

BreakingNews

आता Swiggy Instamart वरून LPG सिलिंडरही मिळणार घरपोच; HPCL सोबत भागीदारी

ठाण्यात ‘NAMASTE दिन’ उत्साहात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडण्यावर भर

दिल्ली मेट्रोची नवी मोहीम; १० स्थानकांवर ‘अर्पण’ केंद्रांद्वारे जुन्या कपड्यांचे रिसायकलिंग!

देशातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकार आणणार ‘फ्लाईंग बस’; नितीन गडकरींची मोठी घोषणा

रेल्वे हद्दीपासून ३० मीटरच्या परिसरात बांधकामासाठी रेल्वेची NOC बंधनकारक!

बलुचिस्तानचा धक्कादायक दावा! स्वतःला ‘स्वतंत्र देश’ घोषित करत ८५ टक्के भागावर मिळवला ताबा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.