Lokrakshanay
Wednesday, June 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास ५०० रुपये दंड भरावा लागणार 

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली असून त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 1, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
पुणेकरांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास ५०० रुपये दंड भरावा लागणार 
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : सार्वजनिक ठिकाणी, पदपथ आणि रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांकडून आता ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली असून त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने तशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे. दंडाच्या रकमेत वाढ केल्याने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार थांबतील, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी, पदपथ आणि रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांना जरब बसावी, यासाठी दंडाची रक्कम वाढविण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्याला स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी मंजुरी दिली आहे.

सार्वजनिक ठिकाणी, पदपथांवर, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना यापूर्वीच्या नियमानुसार १८० रुपयांचा दंड आकारला जात होता. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, लघुशंका करणे, थुंकणे, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, कचरा जाळणे, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर, ओला कचरा जिरविण्यासाठी बल्क वेस्ट यंत्रणा कार्यान्वित न ठेवणे आदींसाठी हा दंड केला जात होता. दंडाची रक्कम पूर्वी शासन मान्यतेने निश्चित करण्यात आली आहे. त्यात कालानुरूप वाढ झालेली नव्हती. त्यामुळे दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली असून, यापुढे १८० रुपयांऐवजी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दंडाची रक्कम कमी असल्याने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, त्यांना जरब बसत नाही. कचरा टाकताना सापडल्यास १८० रुपये भरून नागरिक मोकळे होत होते. त्यामुळे दंड रक्कम वाढत असली, तरी शहर अस्वच्छ राहण्याचे प्रमाण कायम राहत होते. आता दंड रकमेत वाढ केल्याने त्याला आळा बसेल, असा दावा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी केला आहे. दरम्यान, दंडाच्या रकमेत वाढ केली असली तरी ही वाढ खूप मोठी नाही. त्यामुळे उघड्यावर कचरा टाकण्याच्या प्रकारांना आळा बसण्याची शक्यताही कमीच असल्याचे दिसून येत आहे.

Previous Post

१७ लाखाची डोंबिवलीतील तरूणाची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फसवणूक

Next Post

पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी नवी कर्ज योजना – पर्यटन मंत्री गिरीष महाजन

Next Post
पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी नवी कर्ज योजना – पर्यटन मंत्री गिरीष महाजन

पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी नवी कर्ज योजना – पर्यटन मंत्री गिरीष महाजन

BreakingNews

टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी उठली!

माहितीचा अधिकार नियम २०२६ विरोधात अण्णा हजारे मैदानात!

बेस्टचा संप मिटला, मुंबईत बस सेवा पुन्हा सुरू!

चहाविक्रेत्याच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा भांडाफोड; पुण्यात दोघांना अटक!

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.