Lokrakshanay
Thursday, November 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांनी ओलांडला शंभरीचा टप्पा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 4, 2026
in गुन्हेगारी, ठाणे
ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांनी ओलांडला शंभरीचा टप्पा
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मार्च महिन्यात मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांची संख्या शंभरी पार झाल्याचे चित्र आहे. रेल्वे प्रवासातील मोबाईल चोरी, रोकड चोरी आणि हाणामारीसारख्या घटना ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दाखल गुन्ह्यावरून दिसत आहे. रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरटे यांनी धुमाकूळ घातलेला असून मार्च महिन्यात मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांची संख्या शंभरी पार झाल्याचे चित्र आहे.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात आणि विविध प्लॅटफॉर्म त्याच बरोबर गर्दीच्या रेल्वे लोकल यामध्ये दबा धरून बसलेले चोरटे हे लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महागडे मोबाईल चोरण्याचे प्रकार वाढीस लागलेले आहेत. तर दुसरीकडे रेल्वे स्थानकावर लोकलमध्ये चढताना किंवा उतरताना चोरटे प्रवाशांचे मोबाईल चोरण्याचा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे रेल्वे पोलिसांना चोऱ्यांचे आव्हान ठरत आहे. एका महिन्यात शंभरी पार मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रारदारांनी दाखल केलेल्या आहेत. त्यासोबतच रोकड असलेल्या सॅक बॅगांवरही हातसफाई करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. गर्दीचा फायदा घेऊन पोलीस रेकॉर्डवर नसलेल्या आरोपींद्वारे करण्यात येणाऱ्या चोऱ्यांप्रकरणी अज्ञात चोरट्यांचा तपस करणे म्हणजे आंध्रात चाचपण्यासारखा प्रकार आहे. केवळ स्थानकावर लागलेल्या सीसीटीव्ही हाच एकमेव संशयित आरोपी शोधून त्यांच्या माहिती काढीत आरोपींपर्यंत पोहचणे ही तारेवरची कसरत ठरत आहे. मात्र गर्दीच्या लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांतून चोरट्याला हेरणे आणि शोधणे हे कडवे आवाहन आहे. मात्र ठाणे रेल्वे पोलिसांनी मात्र या आव्हानाला पेलवत अनेक मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवलेले आहे.

Previous Post

राज्यातील प्रत्येक शाळेत मासिक पाळीच्या काळात विश्रांतीसाठी ‘पिंक रूम’! विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Next Post

पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक – आयकर विभागाचा इशारा

Next Post
पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक – आयकर विभागाचा इशारा

पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक - आयकर विभागाचा इशारा

BreakingNews

पनवेलमध्ये डासांचा विळखा कायम! ‘१०० कर्मचारी फवारणीसाठी कार्यरत’; पालिका प्रशासनाचा दावा

ब्रिक्स+ चित्रपट महोत्सवात छाया कदम यांचा सन्मान; ‘स्नो फ्लॉवर’मधील अभिनयाला आंतरराष्ट्रीय गौरव

पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद; आता थेट पुढील वर्षीच प्रवाशांसाठी खुला होणार

अंजूरमध्ये गरोदर व स्तनदा मातांना पोषण किटचे वाटप; माता-बालकांच्या आरोग्यासाठी संयुक्त उपक्रम

नागपुरात रंगणार ६९वे महाराष्ट्र केसरी पर्व; २० ते २४ जानेवारीदरम्यान १,३०० मल्लांची दमदार लढत

पुण्यातील टिंबर मार्केटला मध्यरात्री भीषण आग; ५० ते ६० लाकडाची दुकाने जळून खाक

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

imunify-bot-check