मुंबई : Narendra Modi यांच्या इटली दौऱ्यादरम्यान Giorgia Meloni यांच्यासोबत झालेली भेट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. राजकीय चर्चांपेक्षा या भेटीत दिलेल्या एका छोट्याशा गिफ्टने नेटिझन्सचे विशेष लक्ष वेधले आहे. पंतप्रधान मोदी यांनी मेलोनी यांना भारतातील लोकप्रिय ‘Melody’ टॉफी गिफ्ट दिली आणि त्यानंतर “Melody” हा शब्द पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. विशेष म्हणजे इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी स्वतः या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर इंटरनेटवर या टॉफीची जबरदस्त चर्चा रंगली. अनेकांनी या क्षणाला “Melodi Moment” असे नाव दिले, तर काहींनी “Best Brand Ambassadors” आणि “Diplomatic Toffee” अशा भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. सोशल मीडियावर या भेटीशी संबंधित मीम्स आणि पोस्ट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या छोट्याशा गिफ्टमुळे निर्माण झालेला ट्रेंड चर्चेचा विषय ठरला आहे.
या व्हायरल क्षणाचा परिणाम थेट क्विक कॉमर्स अॅप्सवरही दिसून आला. लोकांनी मोठ्या प्रमाणात Melody टॉफी शोधण्यास सुरुवात केली आणि काही भागांमध्ये Blinkit, Zepto आणि Instamart वर ही टॉफी “Out Of Stock” दाखवली जाऊ लागली. सोशल मीडियावर अनेकांनी याचे स्क्रीनशॉट शेअर करत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. काही युजर्सनी तर “Parle ला यापेक्षा चांगली जाहिरात कधीच मिळाली नसती” असे म्हणत या ट्रेंडची खिल्ली उडवली. Business Today च्या अहवालानुसार, अनेक शहरांमध्ये Melody टॉफीची मागणी अचानक वाढल्याने ती उपलब्ध नसल्याचे दिसून आले. भारत-इटली संबंधांपेक्षा या भेटीनंतर “Melody” ट्रेंडचीच अधिक चर्चा रंगताना दिसत असून, अनेकांनी याला “Soft Diplomacy” चे भन्नाट उदाहरण म्हटले आहे.

