Lokrakshanay
Saturday, November 7, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

दिव्यांगांना आता जन्मापासूनच मिळणार पेन्शनचा लाभ! – दिव्यांगांसाठी केंद्राचा निर्णय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 7, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश, महाराष्ट्र
दिव्यांगांना आता जन्मापासूनच मिळणार पेन्शनचा लाभ! – दिव्यांगांसाठी केंद्राचा निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : दिव्यांग मुलांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला असून आता पात्र दिव्यांग मुलांना जन्मापासूनच पेन्शनचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई पॅरा गेम्समधून परतलेल्या खेळाडूंशी संवाद साधताना ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री दिव्यांगजन पेन्शन योजनेत महत्त्वाचे बदल मंजूर केले आहेत. याअंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी असलेली किमान वयोमर्यादा पूर्णपणे रद्द करण्यात आली असून, यापूर्वी पेन्शनसाठी आवश्यक असलेला दिव्यांगत्वाचा निकष ८० टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकाधिक दिव्यांग नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच पेन्शनसाठी अर्ज करता येत होता, मात्र आता पात्र दिव्यांग मुलांना जन्मापासूनच या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच सरकारने पेन्शनच्या रकमेतही वाढ केली असून ७९ वर्षांपर्यंतच्या लाभार्थ्यांना दरमहा ₹३७५, तर ८० वर्षे व त्यावरील वयोगटातील लाभार्थ्यांना दरमहा ₹६२५ केंद्रीय सहाय्य दिले जाणार आहे.

या निर्णयामुळे लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून ती ८.३३ लाखांवरून २७.४८ लाखांपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे. या योजनेचा लाभ विशेषतः दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांतील ४० ते ७९ टक्के दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना तसेच प्रमाणित दिव्यांगत्व प्रमाणपत्र असलेल्या मुलांना मिळणार आहे. यापूर्वी अशा कुटुंबांना मुलाचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागत होती, मात्र आता जन्मापासूनच आर्थिक मदत मिळणार आहे. याशिवाय, सध्या पेन्शनचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांनाही वाढीव दरानुसार पेन्शन मिळणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार देशात सुमारे २.६८ कोटी दिव्यांग व्यक्ती असून, २०१६ च्या दिव्यांग अधिकार कायद्यानुसार २१ प्रकारच्या दिव्यांगत्वांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे दिव्यांग नागरिकांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Previous Post

दिवाळीनिमित्त मुंबईकरांना सरकारी ‘गिफ्ट’! सोमवार, ९ नोव्हेंबरला स्थानिक सुट्टी जाहीर

Next Post

पालघर जिल्ह्यात केवळ ४४% वाहनांना ‘एचएसआरपी’; तब्बल २.६६ लाख वाहनधारकांची अजूनही नियमांकडे पाठ

Next Post
पालघर जिल्ह्यात केवळ ४४% वाहनांना ‘एचएसआरपी’; तब्बल २.६६ लाख वाहनधारकांची अजूनही नियमांकडे पाठ

पालघर जिल्ह्यात केवळ ४४% वाहनांना 'एचएसआरपी'; तब्बल २.६६ लाख वाहनधारकांची अजूनही नियमांकडे पाठ

BreakingNews

पालघर जिल्ह्यात केवळ ४४% वाहनांना ‘एचएसआरपी’; तब्बल २.६६ लाख वाहनधारकांची अजूनही नियमांकडे पाठ

दिव्यांगांना आता जन्मापासूनच मिळणार पेन्शनचा लाभ! – दिव्यांगांसाठी केंद्राचा निर्णय

दिवाळीनिमित्त मुंबईकरांना सरकारी ‘गिफ्ट’! सोमवार, ९ नोव्हेंबरला स्थानिक सुट्टी जाहीर

पालघरमधील १,२३५ अंगणवाड्यांचे विद्युतीकरण; बालकांना मिळणार आधुनिक सुविधा आणि शिक्षणाला नवी ऊर्जा

ठाणे महापालिकेच्या पेन्शनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सुविधा; घरबसल्या होणार प्रक्रिया

“डिलिव्हरी बॉईजची कमाई वाढवणारी योजना”; स्विगीच्या नव्या उपक्रमाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून कौतुक

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

imunify-bot-check