Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

कारवाईच्यावेळी वाहनचालक उपस्थित असल्यास केवळ ‘नो-पार्किंग’चा दंड; ‘टोइंग’च्या सरसकट भुर्दंडातून सुटका

वाहनचालक उपस्थित असताना ‘नो-पार्किंग’ किंवा ‘राँग पार्किंग’ची कारवाई केल्यास, त्याच्याकडून गाडी ओढून नेण्याचा (टोइंग) दंड आता घेता येणार नाही.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 20, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
कारवाईच्यावेळी वाहनचालक उपस्थित असल्यास केवळ ‘नो-पार्किंग’चा दंड; ‘टोइंग’च्या सरसकट भुर्दंडातून सुटका
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : वाहनचालक उपस्थित असताना ‘नो-पार्किंग’ किंवा ‘राँग पार्किंग’ची कारवाई केल्यास, त्याच्याकडून गाडी ओढून नेण्याचा (टोइंग) दंड आता घेता येणार नाही. नियमबाह्य पार्किंगवर कारवाई कशी करायची, याबाबत पुणाच्या पोलीस आयुक्तांनी मार्गदर्शक सूचनाच जारी केल्या असून, त्यामध्ये ही स्पष्टता आणली आहे.  बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी ‘टोइंग व्हॅन’चा वापर करण्यात येतो. गाड्या ओढून नेण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. प्रत्यक्ष कारवाई करताना ‘टोइंग व्हॅन’वरील कामगार वाहनचालकांशी अरेरावी करतात, अशा तक्रारी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी परिपत्रक जारी केले. पोलीस आयुक्तालयात टोइंग करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पोलीस आयुक्तांनी मार्गदर्शक सूचना दिल्या.

या सूचनांनुसार, वाहन चुकीच्या ठिकाणी वा पद्धतीने लावल्याबद्दल होणाऱ्या कारवाईच्या वेळी वाहनचालक उपस्थित असल्यास त्याच्याकडून गाडी ओढून नेण्याचा (टोइंग व्हॅन) खर्च घेण्यात येऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक वाहनचालकांना सम-विषम दिनांक पद्धत माहिती नसते. काहीजण बाहेरगावाहून येतात. त्यामुळेही पार्किंगबाबत माहिती नसते. अशा वेळी वाहनचालक कारवाईच्या वेळी उपस्थित असूनदेखील चुकीच्या पद्धतीने गाडी लावण्यासाठी केलेल्या कारवाईबरोबरच टोइंग व्हॅनचा दंडही वाहनचालकाकडून आकारला जातो. आता याला आळा बसेल. शिवाय, सम-विषम दिनांक विचारात न घेता वाहन लावल्याचे आढळून आल्यास टोइंग व्हॅनमधील पोलीस कर्मचाऱ्यांनी याबाबतची घोषणा ध्वनीक्षेपकाद्वारे करावी, अशीही सूचना करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी ई-चलन यंत्र आणि वॉकीटॉकी बाळगावी, असेही निर्देश या बैठकीत पोलीस आयुक्तांनी दिले.

वाहन प्रकार दंड जीएसटीसह टोईंग चार्ज एकूण दंड
दुचाकी ५०० रुपये २८५ रुपये ७८५ रुपये
चारचाकी ५०० रुपये ५७१ रुपये १ हजार ७१ रुपये
Previous Post

१ जुलैपासून होणार पुलावरून वाहतूक सुरू; गोखले- बर्फीवाला उड्डाणपुलाचे आव्हानात्मक काम यशस्वी

Next Post

मानपाडा पोलिसांची कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल व ६ काडतुसासह एकजण ताब्यात

Next Post
मानपाडा पोलिसांची कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल व ६ काडतुसासह एकजण ताब्यात

मानपाडा पोलिसांची कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल व ६ काडतुसासह एकजण ताब्यात

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.