Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 19, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन, मुंबई
ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : भारतीय चित्रपटसंगीताला नवी दिशा देणारे ज्येष्ठ संगीतकार आणि पद्मविभूषण सन्मानित इलयाराजा यांना यंदाचा पद्मपाणी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा सन्मान अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यंदा बुधवार, दि. २८ जानेवारी ते रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. महोत्सव उद्घाटन समारंभात, बुधवार दि. २८ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता, एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात पद्मपाणी पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर पुढील पाच दिवस हा महोत्सव आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे होईल.

महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम आणि मानद अध्यक्ष दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी इलयाराजा यांच्या निवडीची घोषणा केली. पद्मपाणी पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक लतिका पाडगांवकर होत्या, तर सदस्य म्हणून आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी काम पाहिले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि दोन लाख रुपये असे आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ इलयाराजा यांनी भारतीय सिनेसृष्टीत अतुलनीय योगदान दिले आहे. आतापर्यंत त्यांनी ७ हजारांहून अधिक गाणी आणि १५०० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संगीत दिले आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी, मराठी अशा विविध भाषांतील त्यांची संगीतरचना आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि पाश्चात्त्य सिम्फनी यांचा सुरेख संगम ही त्यांची खास ओळख आहे. ‘इसैग्नानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इलयाराजा यांच्या संगीत साधनेला हा पुरस्कार अर्पण करण्यात येणार आहे. या महोत्सवात देश-विदेशातील चित्रपटप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, सतीश कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, सहसंचालक जयप्रद देसाई व ज्ञानेश झोटींग, डॉ. अपर्णा कक्कड, श्वेता कागलीवाल, डॉ. आशीष गाडेकर, कला संचालक डॉ. शिव कदम, डॉ. रेखा शेळके, डॉ. प्रेरणा दळवी, शिव फाळके, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, सुबोध जाधव, अमित पाटील, निखील भालेराव आदींनी केले.

Previous Post

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

Next Post

नोकऱ्यांचे संकट संपणार! १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार – CM फडणवीस

Next Post
नोकऱ्यांचे संकट संपणार! १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार – CM फडणवीस

नोकऱ्यांचे संकट संपणार! १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार - CM फडणवीस

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.